नवरात्रीचा उपवास करतानाही वजन कंट्रोल करा; वाचा डाएट टिप्स

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

या काही नवरात्रीतील उपवासाच्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करण्यास या नक्की उपयोगी पडतील...

भारतीय संस्कृतीत अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अनेक सणांची रेलचेल वर्षभर असतेच असते. त्यातीलच एक नवरात्री हा भारतातील एक प्रमुख सण मानला जातो. या नऊ दिवसाच्या सणामध्ये अनेक लोक उपवास करत देवीची आराधना करतात. आपल्या शरीरातील तामस गोष्टींना काढून टाकण्यासाठी म्हणून हा 9 दिवसांचा उपवसा भक्तांकडून केला जातो. मात्र, अनेकदा या उपवासामागील उदात्त हेतू मागेच राहतो. बर्‍याच वेळा लोक या उपवासाला संमारंभातील मेजवानी म्हणून बघण्याची चूक करतात ज्यामुळे उपवासाची संपूर्ण कल्पनाच हरवली जाते.

म्हणूनच, जर तुम्हीही या नवरात्रीत उपवास करत असाल तर तुम्हाला त्याचा जास्तीतजास्त फायदा कसा होईल हे पहा. फक्त इतकंच नव्हे तर जर तुम्ही आम्ही दिलेल्या या टिप्स व्यवस्थितपणे नऊ दिवस फॉलो कराल तर तुम्ही तुमचे वाढलेले जास्तीचे वजन नक्कीच कमी करु शकाल. कमी झालेल्या वजनाने येत्या दिवाळीत तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने दिसू शकाल. वजन कमी करण्यासाठी उपवास हा एक सर्वोत्तम उपाय आहे, असं म्हटलं जातं. दिवसाला चारवेळा जेवण्यापेक्षा उपवास करणे हे अधिक नैसर्गिक आहे. या काही नवरात्रीतील उपवासाच्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करण्यास या नक्की उपयोगी पडतील...

हेही वाचा - स्वयंपाकाच्या ‘तयारी’तच मोठी पोषकता

चौरस आहाराचा समतोल साधा

उपवासाला कमी खाणे अभिप्रेत असलं तरीही आपल्या आहारात शरिराला आवश्यक ते पदार्थ मिळायला हवेत. जेंव्हा तुम्ही तुमचे जेवण काय असावे याचे व्यवस्थितपणे आधीच नियोजन करत नाही तेंव्हा अनावश्यक असं काहीही खाता. उदा. चिप्स, तळलेले पापड, भजी वगैरे वगैरै. तळलेलं आणि मसालेदार असं काहीही चमचमीत खाण्यापेक्षा आधीच तुमच्या उपवासाचा नीटसा प्लॅन करा. या प्रकारचे अन्न खाण्याने तुमचे वजन अधिक वाढू शकते. जर नऊ दिवसांचा एकत्रित प्लॅन करणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर दररोज दुसऱ्या दिवशीच्या एकूण खाण्याचा प्लॅन करा. या प्लॅनमध्ये तुमच्या शरीराला आवश्यक ते सर्व घटक मिळतायत ना याची खात्री करा. यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे अशा सर्व घटकांनीयुक्त चौरस आहार मिळतोय ना याची खात्री करुन घ्या. 

शरीराला आवश्यक पाणी द्या 
एका वेळच्या एकदम मोठ्या जेवणापेक्षा दिवसातून तीन ते चार वेळा थोडं थोडं खाणं केंव्हाही चांगलं. शरीरातील ग्लुकोज लेव्हल संतुलित राहण्यासाठी आणि आपल्याला दिवसभर अगदी उत्साही आणि तजेलदार वाटण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी देणं आणि ते हायड्रेटेड ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी फक्त पाणी नव्हे तर तुम्ही नारळ पाणी, फ्रेश फळांचा ज्यूस, लिंबूपाणी आणि फळभाज्यांचा ज्यूस असं दिवसांतून पीत रहा जेणेकरुन तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. तुमचे शरीराच्या डिटॉक्सीफिकेशनसाठी हे आवश्यक आहे. 

हेही वाचा - रोज अंडे खाल्ल्याने शरीर होईल बळकट; आजार राहतील दूर, जाणून घ्या अंडे का फंडा​
तेलकट-मसालेदार पदार्थ टाळा
उपवासादरम्यान बरेज जण आरोग्यास  बाधक असे अनेक पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातात. तेलकट पुऱ्या, भजी-पकोडा, चीप्स इत्यादी. असे पदार्थ खाणं बिलकूल टाळा कारण उपवासाच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात जाणारे हे पदार्थ आहेत. याऐवजी साबुदाणा खिचडी, वरई, चणे, बटाटा इत्यादींचे सेवन करा. यांच्या सेवनाने वजन तर वाढणार नाही मात्र शरीराला आवश्यक ते घटक पुरेशा प्रमाणात मिळतील. 

उत्तेजक पेयं अति पिणे टाळा...
उपवासाला कॉफिचे सेवन केल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. खूप जास्त कॉफी पिणे आणि चहा पिणे अशा कृती टाळा. उपवासाला अशी पेय पिऊन तरतरी आणण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात. मात्र, दिवसातून अनेकवेळा अशी उत्तेजक पेय पिणे, हे अंतिमत: आपल्याच शरीरास हानीकारक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri 2020 fasting lose your weight naturally 5 tips