Neuro- AIDS : न्‍यूरो एड्‌सवर ‘नॅनो सस्‍पेशन’ने उपचार शक्य; नाशिकच्या डॉक्टरांचे संशोधन

HIV AIDS
HIV AIDSesakal

नाशिक : एचआयव्‍ही (HIV) बाधितांना वाढत्‍या वयासोबत मेंदूविकाराच्‍या समस्‍या उद्‍भवतात. न्‍यूरो एड्‌सचा सामना करणाऱ्या अशा रुग्‍णांसाठी ‘नॅनो सस्‍पेन्‍शन’ या आधुनिक तंत्राचा वापर करून औषध विकसित करण्यात आले आहे. इंजेक्‍शनपेक्षा नाकेवाटे औषध दिल्‍याने अधिक परिणामकारकता मिळत असल्‍याचे संशोधनात आढळले आहे. मेट्‌स इन्‍स्‍टिट्यूट ऑफ फार्मसी येथील प्रा. डॉ. स्‍मिता काकड यांनी हे संशोधन केले आहे. पुढील टप्प्‍यात यशस्‍वी क्‍लिनिकल ट्रायल झाल्‍यास एचआयव्‍ही बाधितांसाठी हे संशोधन अत्‍यंत प्रभावी ठरणार आहे.

HIV AIDS
Yellow Tomato: टमाटरसारख्या दिसणाऱ्या या फळाची बाजारपेठेत चर्चा! फायदे वाचाल तर थक्क व्हाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच.डी. करताना सहाय्यक प्राध्यापिका प्रा. स्‍मिता काकड यांनी हे संशोधन केले आहे. यासाठी त्‍यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

एचआयव्‍हीची लागण झालेल्‍या रुग्‍णांमध्ये कालांतराने विषाणूंचा फैलाव मेंदूपर्यंत होतो. यामुळे रुग्‍णांमध्ये अनेक गंभीर स्‍वरूपाचे मानसिक आजार उद्‍भवण्याची भीती निर्माण होते. हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सध्या इंजेक्‍शनच्‍या माध्यमातून ॲन्‍टी ड्रग दिले जात आहेत. परंतु मेंदूच्‍या प्रतिकार यंत्रणेमुळे (ब्‍लड ब्रेन बॅरियर) दिलेल्‍या औषधाचे अवघे दहा टक्क्‍यांपर्यंतचे घटक प्रत्‍यक्ष मेंदूपर्यंत पोचून आजारावर उपचार करतात. हे प्रमाण लक्षात घेता जादाचे औषध द्यावे लागत असल्‍याने अन्‍य संभाव्‍य दुष्परिणाम उद्‍भवण्याची भीती असते. यावर तोडगा काढताना प्रा. डॉ. काकड यांनी संशोधन केले आहे.

HIV AIDS
Anxiety Disorders : एंझायटीने ४ कोटी लोक त्रस्त, चिंता करण्याऐवजी 'अशी' घ्या काळजी

युनायटेड नेशन्‍सकडून संशोधनाची दखल

एल्‍सविअर पब्लिलीकेशनच्‍या हेलिऑन जर्नलमध्ये हा शोधप्रबंध सादर झालेला आहे. यानंतर युनायटेड नेशन्‍सने संशोधनाची दखल घेतली आहे. सार्वजनिक आरोग्‍य क्षेत्राबाबत शाश्‍वत विकासाचे ध्येय पूर्ण करणारे संशोधन असल्‍याचे गौरवोद्‍गार 'यूएन'ने काढले आहे.

नॅनो सस्‍पेन्‍शनचा वापर, पेटंटसाठी प्रयत्‍नशील

सध्या अस्‍थितत्‍वात असलेल्‍या औषधे (ड्रग्‍स) यांच्‍यातील नॅनो पार्टिकल विकसित करताना 'नॅनो सस्‍पेन्‍शन' तंत्राचा वापर केला आहे. या सूक्ष्म घटकांमुळे मेंदूपर्यंत तुलनेत अधिक प्रमाणात औषध पोचण्यास मदत होते. संशोधनात इंजेक्‍शनऐवजी नाकावाटे औषध दिले जात असल्‍याने औषधाची मात्रा कमी घ्यावी लागते. परिणामकारकता अधिक असल्‍याचे निष्कर्ष नोंदविले आहे. दरम्‍यान या तंत्रासाठीचे पेटंट मिळविण्यासाठी प्रस्‍ताव दाखल केला असून, लवकरच पेटंट मिळण्याची शक्‍यता आहे.

HIV AIDS
Late pregnancy: वयाच्या तिशीत आई व्हायचयं? 'अशी' घ्या काळजी

'मेक इन इंडिया'ला मिळू शकते बळ

सद्यःस्‍थितीत ॲनिमल ट्रायल यशस्‍वी झालेली असून, क्‍लिनिकल ट्रायलची प्रक्रिया पूर्ण करताना गरजू रुग्‍णांसाठी हे तंत्रज्ञान उपलब्‍ध होऊ शकणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय कंपन्‍यांशी पत्रव्‍यवहार करताना क्‍लिनिकल ट्रायल्‍सच्या सहकार्याच्‍या मोबदल्‍यात तंत्रज्ञान हस्‍तांतरणाचा प्रस्‍ताव देण्यात आला आहे. परंतु जर केंद्र सरकार, भारतीय कंपनीच्‍या माध्यमातून मेक इन इंडियाला बळ मिळू शकते.

उपचाराची नवी दिशा

मेंदूशी निगडित विविध प्रकारच्‍या विकारांवर प्रभावी उपचारासाठी हे संशोधन अत्‍यंत प्रभावी ठरू शकते. यासंदर्भात जागतिक स्‍तरावर संशोधन सुरू असून, या संशोधनाचा आधार घेता येणार आहे. नॅनो टेक्‍नॉलॉजी, नाकावाटे औषध देण्याची पद्धती भविष्यात दिशादर्शक ठरू शकते.

HIV AIDS
Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचांय? दररोज शंख वाजवा

''आमच्‍या महाविद्यालयात नॅनो टेक्‍नॉलॉजीशी निगडित संशोधनकार्य अविरतपणे सुरू आहे. न्‍यूरो एड्‌सबाबत झालेले संशोधन व या संशोधनाची युनायटेड नेशन्‍सने घेतलेली दखल भारतीयांसाठी गौरवशाली बाब आहे. या संशोधनामुळे एकंदरीत मेंदूविकाराच्‍या क्षेत्रात प्रभावी उपचारासाठी दिशा मिळू शकेल. सध्या क्‍लिनिकल ट्रायलची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत.'' - प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर, मेट्‌स इन्‍स्‍टिट्यूट ऑफ फार्मसी

''एचआयव्‍ही बाधितांमध्ये मेंदूपर्यंत संसर्ग पोचल्‍यानंतर दैनंदिन जीवन प्रभावित होऊन रुग्‍णांचे सामाजिक आयुष्य विस्कळित होते. यावर उपाय शोधताना संशोधनातून नॅनो सस्‍पेन्‍शन तंत्रातून विकसित औषधे नाकावाटे दिल्‍याने परिणामकारकता आढळली आहे. क्‍निनिकल ट्रायलसाठी सहकार्य मिळाल्‍यास संशोधनाचा रुग्‍णांपर्यंत उपयोग पोचविता येईल.'' -प्रा.डॉ.स्‍मिता काकड, सहाय्यक प्राध्यापिका व संशोधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com