
अनेकजण जेंव्हा केशरी किंवा नारंगी रंगाबाबत बोलतात तेंव्हा ते या रंगाचं वर्णन तेजस्वी, आनंद देणारा किंवा पॉझिटिव्ह वाईब्स आणणारा रंग असा करतात.
मुंबई : प्रत्येक रंगाकडे पाहून आपल्या मूडवर वेगवेगळे परिणाम होत असतात. म्हणूनच आपण रांगांमागील मानसशात्र जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत. या सीसीरिजमध्ये आपण वेगवेगळे रंग आणि त्यामागील विविध रंजक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या लेखातील रंग आहे नारंगी किंवा केशरी. तुम्हाला केशरी रंगाकडे पाहून कसं वाटतं ? नारंगी किंवा केशरी रंग हा खूपच स्ट्रॉग आणि उत्साहवर्धक रंग आहे. लाल किंवा पिवळ्या रंगाप्रमाणे नारंगी किंवा केशरी रंग हा लक्ष वेधक असा रंग असल्याने बहुतेक जाहिरातींमध्ये या रंगांचा वापर होतो.
अनेकजण जेंव्हा केशरी किंवा नारंगी रंगाबाबत बोलतात तेंव्हा ते या रंगाचं वर्णन तेजस्वी, आनंद देणारा किंवा पॉझिटिव्ह वाईब्स आणणारा रंग, असा करतात. तर काही जणांना हा रंग जरा जास्तच ब्राईट जाणवतो. रंगांबाबत आणि त्यामागील मानसशास्त्र जाणणारे तज्ज्ञ सांगतात की पर्पल रंगाप्रमाणे केशरी हा रंग काहीसा विवादास्पद रंग आहे. एकतर लोकांना हा रंग खूप आवडतो किंवा लोकं त्याचा तिरस्कार करतात.
महत्त्वाची बातमी : राज्यातील चार जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक, ठाण्यापाठोपाठ पुणे, मुंबई आणि नागपूर मध्ये अधिक सक्रिय रुग्ण
नारंगी किंवा केशरी रंगाबाबतची ठळक वैशिठ्ये :
मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
orange color psychology and its effect on human mind and body