esakal | ऑक्सिजनची पातळी कमी होतेय? मग करा 'हा' उपाय

बोलून बातमी शोधा

Oxygen Bed

ऑक्सिजनची पातळी कमी होतेय? मग करा 'हा' उपाय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात एक मोठे आरोग्य संकट निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध नाही. तसेच ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थिती आरोग्य मंत्रालयाने काही टीप्स दिल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण घरच्या घरी शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारली जाऊ शकते.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जे कोरोना रुग्ण घरातच राहून उपचार घेतात आणि त्यांना जर श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल, तर त्यांना ऑक्सिजनच्या पातळीवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यावरून त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे की नाही हे समजू शकेल. होम क्वारंटाइन असणाऱ्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर 'प्रोनिंग'द्वारे ऑक्सिजनची पातळी वाढविली जाऊ शकते. वैद्यकीयदृष्ट्या प्रोनिंगला शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढविणारी कृती म्हणून ओळखले जाते. गृह विलगीकरणात राहणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.

ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली गेली तर रुग्ण पोटाच्या स्थितीवर पडून ऑक्सिजनमध्ये सुधार आणू शकतात. या स्थितीमुळे ५ ते १० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजनची पातळी वाढू शकते. प्रोनिंग करण्यासाठी जवळपास चार ते पाच उशांची गरज असते. एक उशी मानेच्या खाली ठेवा. तसेच एक-दोन उश्या छाती आणि पोटाच्या खाली ठेवा आणि दोन उश्या पायांच्या खाली ठेवा. यादरम्यान रुग्णाने लांब श्वास घ्यावे. मात्र, ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ करू नका.

हेही वाचा: पोलिस शिपायांची आंतरजिल्हा बदली रद्द

या व्यक्तींनी करू नका प्रोनिंग -

  • डीप वेन थ्राम्बोसिस (48 तासांपेक्षा कमी वेळेत उपचार)

  • मेजर कार्डिअ‌ॅक कंडीशन्‍स

  • अस्थिर रीढ़, फीमर किंवा पेल्विक फ्रॅक्चर

प्रोनिंग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा -

  • हे जेवणानंतर एक तासापर्यंत करू नका.

  • थकल्यानंतर प्रोनिंग करू नका.

  • प्रोनिंग करताना दुखापतींकडे लक्ष ठेवा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)