Video: पत्रकारितेकडून योग प्रशिक्षणाकडे.. तिचा प्रेरणादायी प्रवास

पत्रकारिता आणि योग प्रशिक्षण हे दोन्ही टोकाचे क्षेत्र आहेत.
rakhee shelke
rakhee shelke

आपल्यापैकी अनेकांना योगसाधनेचं महत्त्व पटलं असून त्याचा करिअर म्हणूनही निवड केला जातोय. पण मुळातच एका क्षेत्रात जम बसवल्यानंतर दुसऱ्या क्षेत्राकडे वळणं इतकं सहजसोपं नसतं. त्यातही पत्रकारिता आणि योग प्रशिक्षण हे दोन्ही टोकाचे क्षेत्र आहेत. लग्नानंतर, बाळंतपणानंतर महिलांचे प्राधान्यक्रम बदलत असतात. अशा वेळी स्वत:च्या फिटनेसकडे वेळ देत कुटुंबातील जबाबदाऱ्या, कामाचा ताण यांचा समतोल राखणं अवघड होऊन जातं. मात्र राखी शेळकेने तरुणींसमोर आणि विशेषकरून 'वर्किंग व्हुमन'समोर एक अनोखं उदाहरण सादर केलंय.

राखी आता योग प्रशिक्षक असून मराठी इंडस्ट्रीमधील काही सेलिब्रिटींनाही ती योग शिकवते. करिअरची ही वेगळी वाट शोधत असताना तिच्यासमोर कोणती आव्हानं होती, बाळंतपणानंतर वाढलेलं वजन तिने योगसाधनेच्या आधारे कसं कमी केलं आणि तिचा हा एकंदर प्रवास कसा होता, ते या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्या..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com