esakal | इनर इंजिनिअरिंग : एक परिपूर्ण ऐक्य

बोलून बातमी शोधा

Sadguru}

जीवनाचं भौतिक स्वरूपच असं आहे, की काहीही केलं तरी जीवन कधी परिपूर्ण होऊ शकत नाही – त्यात सुधार करण्याची शक्यता नेहमीच असते. तरी ब्रह्मांडाची भौमितिक रचना एका परिपूर्ण स्थितीत असल्यामुळं जीवसृष्टी एका निश्चित स्वरूपाच्या परिपक्वतेत आहे.

health-fitness-wellness
इनर इंजिनिअरिंग : एक परिपूर्ण ऐक्य
sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

जीवनाचं भौतिक स्वरूपच असं आहे, की काहीही केलं तरी जीवन कधी परिपूर्ण होऊ शकत नाही – त्यात सुधार करण्याची शक्यता नेहमीच असते. तरी ब्रह्मांडाची भौमितिक रचना एका परिपूर्ण स्थितीत असल्यामुळं जीवसृष्टी एका निश्चित स्वरूपाच्या परिपक्वतेत आहे. आणि यामुळंच ती अशी बहरून, फुलून नटलेली आहे. आज याचा ठाव घेण्यासाठी एक परिपूर्ण विज्ञान आहे, जे सृष्टीतल्या प्रत्येक आकार आणि रूपाच्या आण्विक रचनेमागच्या भूमितीचं परीक्षण करतं. मूलभूतरित्या अणूपासून ब्रह्मांडापर्यंत सर्वांची भौमितिक संरचना एकसमान आहे. ही रचना इतकी परिपूर्ण आहे, की जीवसृष्टी  मृदू, नाजूक, त्याच वेळी कणखर आणि सुंदर आहे.

भूमितीची ही मूलभूत परिपूर्णता आयुष्यात प्रकट करण्याच्या प्रयत्नामध्ये योगाची एक अतिशय जटिल आणि परिष्कृत प्रणाली घडवली गेली. योग प्रणाली म्हणजे तुमची अवघी यंत्रणा – अर्थात, तुमचं शरीर, मानसिक रचना, भावनिक चौकट, तुमच्या कर्माची रचना आणि तुमच्या मूलभूत जीवन ऊर्जेचा आधार – ह्या सर्वांना एका परिपूर्ण भौमितिक समतोलात प्रस्थापित करण्याबद्दल आहे, जेणेकरून तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप होऊ शकाल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योग किंवा योगावस्था म्हणजे डोकं खाली पाय वर करणं नव्हे, किंवा दोन पायांऐवजी एका पायावर उभं राहणं नव्हे - योग म्हणजे सर्वांशी एकरूप होणं, ऐक्य साधणं. एखादी व्यक्ती, जी सामान्यतः त्यांचं शरीर आणि भावनांच्या सीमित मर्यादांमध्ये अडकलेली असताना ती स्वतःमध्ये परिपूर्णता प्राप्त करते, जिथे ती स्वतःच्या अनुभवात सबंध सृष्टीशी एकरूप झालेली असते, तेव्हा ती योगावस्थेत असते. ही एक अशी बीजरूप शक्यता आहे, जी प्रत्येक व्यक्तीत सुप्तावस्थेत असते. तुम्ही प्रयत्नांची जोड देण्यासाठी तयार असल्यास तुम्ही तुमच्यात अवघं ब्रम्हांडच असल्याची अनुभूती होईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मानवात ऐक्य किंवा एकरूपता अनुभवण्याची तीव्र ओढ असते. ऐक्याच्या या तीव्र इच्छेला शारीरिक अभिव्यक्ती मिळाल्यास आपण तिला लैंगिकता म्हणतो.  ती भावनिक पैलूतून व्यक्त झाल्यास त्याला प्रेम किंवा करुणा म्हणतात. ही इच्छा मानसिक चौकटीतून अभिव्यक्ती झाल्यास तिला यश, विजय किंवा हल्ली याला शॉपिंग असे म्हणतात. एखादी व्यक्ती संपत्ती, पैसा, विजय, यश, आनंद किंवा नशा यांच्या मागे धावत असेल – ही सगळी धडपड केवळ एकरूपतेच्या उत्कटतेपोटीच आहे. अनेक युगांपासून, लोक ह्या मार्गांनी ऐक्य साधण्याचा  प्रयत्न करत आहेत, पण खरोखर ह्या माध्यमातून कोणालाही हे साध्य झाले नाही. पण या उत्कटतेला एखाद्याच्या अस्तित्वाची चिरस्थायी अभिव्यक्ती मिळाली, तर त्याला योग म्हणतात.

Edited By - Prashant Patil