इनर इंजिनिअरिंग : बंधनांच्या पल्याडचा परमानंद

‘अध्यात्म’ हा शब्द पृथ्वीवरील सर्वांत भ्रष्ट शब्द आहे. याचा वापर आणि गैरवापर विविध प्रकारे लक्षावधी मार्गांनी केला गेला आहे. मुख्यतः अज्ञानामुळे, पण अनेक वेळा अनैतिकतेने.
Mind Body Soul
Mind Body SoulSakal
Summary

‘अध्यात्म’ हा शब्द पृथ्वीवरील सर्वांत भ्रष्ट शब्द आहे. याचा वापर आणि गैरवापर विविध प्रकारे लक्षावधी मार्गांनी केला गेला आहे. मुख्यतः अज्ञानामुळे, पण अनेक वेळा अनैतिकतेने.

‘अध्यात्म’ हा शब्द पृथ्वीवरील सर्वांत भ्रष्ट शब्द आहे. याचा वापर आणि गैरवापर विविध प्रकारे लक्षावधी मार्गांनी केला गेला आहे. मुख्यतः अज्ञानामुळे, पण अनेक वेळा अनैतिकतेने. त्यामुळे अध्यात्म खरोखरच उपयुक्त आहे की नाही, याबद्दल लोकांच्या मनात मोठा संभ्रम आणि शंका निर्माण झाली आहे.

अध्यात्म हे काही भौतिक आयामाशी संबंधित नाही. आपण अध्यात्म असे म्हणतो, तेव्हा आपण शरीर, मन, भावना आणि भौतिक ऊर्जा या एकीकृत यंत्रणेच्या पलीकडे असणाऱ्या परिमाणाविषयी बोलतो. आध्यात्मिक प्रक्रियेचे सार शरीर आणि मनाच्या मर्यादा मोडून पाडण्यासाठी आवश्यक ती तीव्रता, प्रखरता निर्माण करण्याचे एक साधन म्हणून समजावून घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यक्तिगत सीमित स्वरूपाच्या बाहेर पडता. हे साध्य करण्यासाठी योग हे तंत्रज्ञान आहे. हे सर्व स्तरांवरील आंतरिक परिवर्तनाचे एक साधन आहे.

एकदा हे साध्य केले, की तुमच्या भोवताली किंवा तुमच्या आत किंवा या विश्वात हवे तिथे तुम्हाला हवी असणारी गोष्ट निर्माण करण्याचे प्रचंड स्वातंत्र्य प्राप्त होते, कारण जीवनाची अत्यंत मूलभूत तत्त्वे तुमच्या नियंत्रणात येतात. अचानकपणे, काळ आणि अवकाशाचे कोणतेही बंधन उरत नाही. ही क्षमता प्राप्त करण्यासाठी, सर्वप्रथम आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला उन्माद आणि अत्युच्च आनंदी स्थितीत प्रस्थापित करणे – एक पूर्णतः परमानंदाने धुंद स्थिती.

याच गोष्टीच्या शोधात असणारी लोकं, जे त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राजी नाहीत ते मद्य किंवा अमली पदार्थांची निवड करतात. लोकांनी मद्य, अमली पदार्थांसारख्या रासायनिक पद्धतीने किंवा इतर कोणत्याही बाह्य मार्गांनी मुक्तीची क्षणिक भावना निर्माण केली, तर तुमच्या असे लक्षात येईल की जेव्हा त्यांना त्या गोष्टींचा आधार नसतो, तेव्हा त्यांची अतिशय दयनीय अवस्था बनते. लोक फक्त योगायोगानेच आनंदी झाली, स्वेच्छेने आनंद मिळविण्यासाठी त्यांनी त्यांची स्वतःची प्रणाली निर्माण केली नाही, तर सहसा ते मानसिकदृष्ट्या खचून जातात. परंतु तुम्ही कोणत्याही बाह्य गोष्टींची मदत घेतली नाहीत आणि आपल्या शरीराला आणि मनाला तिच्या पूर्ण क्षमतेने आणि व्याप्तीने कार्यरत होण्याची मुभा दिलीत, तर तुमच्या असे लक्षात येईल की तुम्ही अधिक अद्‌भुत प्रकारे धुंद होऊ शकता. तुम्ही दिवसाचे चोवीस तास धुंदीत राहू शकता; कुठल्याही प्रकारचा हँगओव्हर नाही, कोणताही त्रास नाही आणि तुम्ही पूर्णपणे जागरूक असता आणि तुमच्या क्षमतांमध्ये पण सुधारणा झालेली दिसते. तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्या शरीरातच आहेत.

एक काळ असा होता जेव्हा आपली अशी श्रद्धा होती, की तुमच्या घरातील झाडाला फळे येतील की नाही हे ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून असे. मात्र, आपण या गोष्टींचा ताबा घेतला. आता झाडाला फळे लागत नसल्यास काय समस्या आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी काय करायला हवे हे आपल्याला माहिती आहे. हळू हळू आपण या गोष्टी शोधून काढल्या. त्याचप्रमाणे, तुम्ही स्वतः बहरत, फुलत नसाल, याचे कारण तुम्ही स्वतःसोबत योग्य त्या गोष्टी करत नाही आहात – हे एवढे सोपे आहे. जेव्हा आपल्याला हे समजते, तेव्हाच आध्यात्मिक प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com