esakal | धक्कादायक! 2050 पर्यंत जगातील चारपैकी एका व्यक्तीची श्रवणशक्ती होणार कमजोर; WHO चा महत्वपूर्ण दावा

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

जागतिक आरोग्य संघटनेने जगाला (मंगळवारी) महत्वपूर्ण संदेश देताना असा इशारा दिला आहे, की 2050 पर्यंत जगातील चारपैकी एका व्यक्तीला श्रवणविषयक समस्येचा त्रास होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

धक्कादायक! 2050 पर्यंत जगातील चारपैकी एका व्यक्तीची श्रवणशक्ती होणार कमजोर; WHO चा महत्वपूर्ण दावा

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : जागतिक आरोग्य संघटनेने जगाला (मंगळवारी) महत्वपूर्ण संदेश देताना असा इशारा दिली आहे, की 2050 पर्यंत जगातील चारपैकी एका व्यक्तीला श्रवणविषयक समस्येचा त्रास होणार आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत काही सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे, की पहिल्या जागतिक अहवालात संसर्ग, रोग, जन्मदोष, ध्वनी प्रदूषण, जीवनशैली यासह अनेक समस्यांच्या कारणांना प्रतिबंधितीत केले जाऊ शकते. मात्र, त्यासाठीच्या उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सध्या जगात प्रत्येक व्यक्तीला कर्णबधिरतेच्या समस्येने जखडून ठेवले असून पुढच्या काही दिवसांत 2.5 बिलियन लोकांना या समस्येपासून कोणीही रोखू शकणार नाही. 2019 मध्ये 1.6 बिलियन इतकी संख्या होती, तर आता 2050 पर्यंत कर्णबधिरांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला असून याचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पाठ दुखीच्या त्रासापासून हवीय मुक्तता? हे उपाय करा

श्रवणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे, गरीबी आणि व्यवसाय. ही दोन्ही स्थिती असलेल्या देशांमध्ये या समस्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आरोग्य सेवेचे क्षेत्र कमी प्रमाणात असल्यामुळे या समस्येचा सामना करणे कठीण बनले आहे. मात्र, जागतिक संघटनेच्या अहवालानुसार जर ही स्थिती अशीच राहिली तर जगातील अनेक लोकांना बधिरपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

VIDEO : मेनस्ट्रुअल कप वापरायची भीती वाटते? मग हा व्हिडिओ बघा अन् सर्व शंका दूर करा

अहवालात असे नमूद केले आहे, की सार्वजनिक ठिकाणी होणारा आवाज (डीजे, लाउडस्पीकर इ.) आपल्या या समस्येला प्रकर्षाने कारणीभूत ठरत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेणे आवश्यक असून या आजारांवर त्या-त्या क्षेत्रात लसीकरण वाढविणे देखील गरजेचे बनले आहे, अन्यथा ही समस्या अशीच वाढण्याचा धोका आहे. पुढील काही दशकात श्रवणशक्तीची समस्या गंभीर असून या अपयशामुळे दरवर्षी एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान होताना दिसत असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी एका अहवालात स्पष्ट केले आहे.