हेल्दी फूड : कार्बोहायड्रेट्स तुमचे शत्रू नव्हेत!

कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहेत. ते तुमचा मेंदू, किडनी, स्नायू, मज्जासंस्थेला इंधन पुरवण्याचे काम करतात.
Healthy Food
Healthy FoodSakal

वाचकांनो नमस्कार, आज तुमच्या हृदयाच्या अगदी जवळच्या व मोठ्या मनोरंजक विषयावर बोलूयात. तुम्ही कार्बबद्दल ऐकल्यावर लगेचच तुमचा मेंदू त्यांपासून दूर राहा असा सल्ला देतो का? बिचारे कार्ब! त्यांनी तुमचे काय वाईट केले आहे...चला तर, आपण या मायक्रोन्यूट्रियन्टबद्दलची खरी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेऊयात.

कार्बोहायड्रेट्स

कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहेत. ते तुमचा मेंदू, किडनी, स्नायू, मज्जासंस्थेला इंधन पुरवण्याचे काम करतात. उदा. फायबर हे कार्बोहाड्रेट तुमच्या चयापचय शक्तीला बळ देतात, तुम्ही खात असताना पोट गच्च झाल्याचा संदेश पोचवतात व तुमच्या रक्तातील कोलस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. तुमचे शरीर अतिरिक्त कार्बोहाड्रेट्स तुमच्या स्नायू आणि यकृतामध्ये साठवून ठेऊ शकते व जेव्हा तुमच्या अन्नातील काब्रोहाड्रेट्सचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा उपयोग करते. आहारातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी झाल्यास तुम्हाला डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, मन एकाग्र करण्यातील अडचणी, मळमळ, अपचन, प्रथिने आणि खनिजांची कमतरता असे अनेक विकार जाणवू शकतात.

बहुतांश ४५ ते ५६ वयोगटातील प्रौढ त्यांना आवश्यक कॅलरीज कार्बोहायड्रेट्समधून मिळवतात. एक ग्रॅम कार्बोहायड्रेट्समध्ये ४ कॅलरीज असतात. तुम्ही दिवसभरातील तुमचा डाएट प्लॅन पाळून २००० कॅलरीज मिळवत असल्यास तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त २२५ ते ३२५ ग्रॅम काब्रोडायड्रेट्स आहारात घेणे अपेक्षित आहे. कार्बोहायड्रेट्स योग्य प्रकारात व योग्य वेळेस घेतल्यास तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात व तुम्हाला तुमचे वजन घटविण्यासही मदत करतात. कार्बोहायड्रेट्सचे अनेक फायदे असले, तरी तुम्ही ते कमी प्रमाणात घेत आहात, हे सुनिश्चित करा. त्यांचे अतिरिक्त प्रमाण असलेला आहार घेतल्यास तुमच्या रक्तातील साखर वाढेल व तुमचे वजनही मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याचवेळी तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स जाणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, त्यातून तुमच्या शरीराला आवश्यक पौष्टिक पदार्थ मिळतील व वजन योग्य राखले जाईल.

ही तारेवरची कसरत तुम्ही साधाल, या अपेक्षेसह.

कोणते कार्बोहायड्रेट्स खावेत

१) फळे आणि भाज्या

२) शेंगदाणे

३) राजगिरा, टरबूज, सूर्यफूल, जवस, सब्जा आदींच्या बिया

४) उपयुक्त स्टार्टचे विपुल प्रमाण असलेले रताळ्यासारखे पदार्थ

कोणते कार्बोहायड्रेट्स टाळावेत

१) धान्ये - तुम्ही दररोज व्यायामातून ४०० ते ५०० कॅलरीज जाळत नसल्यास धान्ये टाळावीत

२) फ्रूट ज्यूसच्या माध्यमातून होणारा फळांचा अतिरेक.

३) ग्लुटेनचे अधिक प्रमाण असलेली धान्ये

४) स्टार्टचे अधिक प्रमाण असलेल्या भाज्या व तळलेले पदार्थ

५) शरीरात जाणारी साखर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com