शिबानी दांडेकर म्हणते, मला खेळाची आवड आहे, पण...

शिवानी दांडेकर
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मला एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून शरीराकडे लक्ष देणे गरजेचेच होते. बरेच लोक या क्षेत्रात आल्यानंतर फिटनेसकडे लक्ष देतात, मात्र मी त्याआधीपासूनच माझ्या शरीराच्या बाबतीत जागृत होते. ऑस्ट्रेलियामध्ये वाढली असल्याने मला खेळाची आवड आहे. मला जीम कधीच आवडली नाही. किंबहुना, जिम ही माझ्यासाठी बनलेलीच नाही असे मला वाटते. त्यापेक्षा मला बाहेर जाऊन एखादा खेळ खेळणे, नृत्य, योगासने करायला जास्त आवडते. व्यायामासाठी मी एका प्रकारावर कधीच अवलंबून राहत नाही.

स्लिम फिट - शिबानी दांडेकर, अभिनेत्री 

Image may contain: 1 person, smiling, text

एकाच व्यायामाने तुमचा मेंदू थकतो आणि व्यायाम करायला प्रेरणा मिळणे बंद होते. त्यासाठी मी माझ्या व्यायामाच्या पद्धतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असते. मला सर्वांत जास्त आवडतात ती योगासने! यामुळे शरीराचा फिटनेस राखला जातो आणि मनःशांती मिळते. त्याचबरोबर किक बॉक्सिंग, नृत्य तर कधीतरी नुसते चालणे मी पसंत करते.

खेळामध्ये मी लहानपणापासूनच प्रावीण्य मिळवत आले आहे. त्यामुळे सॉफ्टबॉल, नेटबॉल हे माझे आवडते प्रकारही मी खेळते. माझे शरीर कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत असते. नृत्याबद्दल सांगायचे तर तेच माझे जगणे आहे, त्यामुळे इच्छा असेल तेव्हा मी नृत्य करते. 

Image may contain: 1 person, close-up

मला जंक फूड खूप प्रमाणात आवडायचे. अजूनही आवडते, पण शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. त्यामुळे मी माझ्या आवडत्या जंक फूडचा त्याग केला आहे. मी जास्त प्रोटीन असलेले डाएट घेते. यामध्ये मुख्यतः मटण, मासे, ताजी फळे, भाज्या आदी गोष्टी खाते. त्याचबरोबर सुकामेवा आणि दहीही माझ्या रोजच्या खाण्यात असते.

एकदा का तुम्ही तुमच्या मनाला, या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी गरजेच्या आहेत हे समजून सांगितले की, नंतर काही अडचणी येत नाहीत. प्रत्येकाने फिट राहिलेच पाहिजे, मात्र त्यासाठी अशाप्रकारे डाएट किंवा व्यायाम करायला हवा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. फिट राहण्याचे प्रत्येकाने स्वतःचे मार्ग शोधायला हवेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shibani dandekar talking on fitness funda