मधुमेही रुग्नांनी साखर खाऊ नये? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्नांना ५५ पेक्षा कमी ग्लाईसेमिक इंडेक्स असलेल्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासली पाहिजे.
मधुमेही रुग्नांनी साखर खाऊ नये? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Blood Sugar: डायबेटीज((Diabetes) म्हणजे मधुमेह हा आजार चूकीच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होतो आणि हा आजार पूर्णपणे बरी करणारी कोणतीही विशिष्ट उपचार पध्दती नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि जीवनशैलीत बदल करून मधुमेह निंयत्रित करता येतो.

मेडिकल टर्ममध्ये साखरचे पातळी वाढण्याला हायपरग्लाईसीमिया असे म्हटले जाते. डायबेटीज एक क्रॉनिक मेटाबॉलिक समस्या आहे (chronic metabolic condition)ज्यामध्ये मधुमेहग्रस्त व्यक्तीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. जगभरात मुधमेही रुग्नसंख्या वाढत चालली आहे. भारतातही मधुमेही रुग्नांची संख्या खूप जास्त आहे. मधुमेह आजारामध्ये खाण्यापिण्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते.

मधुमेही रुग्नांनी साखर खाऊ नये? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
फक्त आठ दिवस बाकी! त्वरित उरका EPF, ITR सह ही चार महत्त्वाची कामे

मधूमेहाबाबत लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, ज्यावर लोक नेहमी विश्वास ठेवतात. आम्ही येथे अशा गोष्टी सांगत आहोत ज्या मधुमेही रुग्नांना माहित असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊ या, मधुमेह संबधित काही गैरसमज आणि त्यामागील सत्य.(Diabetes myths and facts)

कार्बोहाइड्रेट्स खाऊ नये (Don't eat carbohydrates) : मधमेहग्रस्त लोकांना कोणत्याही एक्सपर्टच्या सल्ल्याशिवाय आसपासच्या लोकांचे मत ऐकून कोणतेही विशेष पदार्थ खाणे टाळतात किंवा जास्त खातात ज्यामुळे शरीराच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. मधुमेही रुग्नांना योग्य प्रकारच्या कार्बचे सेवन करायाल हवे. त्यासोबतच दिवसाभराती कोणत्या जेवणात किती प्रमाणात कार्बचा समावेश केला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे.

कृत्रिम साखरेचा वापर (Use of artificial sugars) : बरेच लोक आपली रक्तातील साखरेची पातळी निंयत्रित ठेवण्याऐवजी कृत्रिमरित्या बनविल्या गोड पदार्थांचे सेवन करतात. कृत्रिम साखर( artificial sugars) किंवा शुगर फ्रि पदार्थांचा सेवन केल्यास साखरची पातळी नियंत्रित करण्यास फायदा होतो असे त्यांना वाटत असते. पण एक्सपर्टच्या मतानुसार, कृत्रिम साखर किंवा शुगर फ्रि पदार्थांचे केल्याने इन्सुलिन रेजिस्टेंसच्या स्थिती गंभीर असू शकते.

मधुमेही रुग्नांनी साखर खाऊ नये? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
शारीरिक संबंधासाठी बायकोचा नकार? जाणून घ्या पाच कारणे

बारीक किंवा पातळ लोकांना मधूमेह होत नाही (Lean people do not have diabetes): बारीक किंवा पातळ दिसणाऱ्या लोकांना मधूमेह होत नाही असे आजिबात नाही. पातळ किंवा बारीक लोकांनाही मधुमेह होऊ शकतो कारण, बऱ्याच लोकांची फॅट शरीरवर दिसून येत नाही पण ते शरीराच्या आत असते.

गोड पदार्थांमुळे होणारा मधुमेह (Diabetes caused by sweets): मधुमेह म्हटलं की सर्वात आधी लोकांच्या मनात येतो गोड पदार्थ, पण मधुमेह होण्याचे कारण फक्त साखर किंवा गोड पदार्थ नसतात. गोड पदार्थ खाल्यामुळे वजन वाढते आणि त्या लठ्ठपणामुळे मधुमेह टाईप 2 होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com