कोरोनाकाळात बसून राहणं बनलं डिप्रेशनचे कारण|Health Issue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिप्रेशन
कोरोनाकाळात बसून राहणं बनलं डिप्रेशनचे कारण

कोरोनाकाळात बसून राहणं बनलं डिप्रेशनचे कारण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

एप्रिल ते जून 2020 या काळात कोविड-19 साथीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये ज्या लोकांनी बसून जास्त वेळ घालवला, त्यांच्यामध्ये नैराश्याची लक्षणे जास्त असल्याचं एका नवीन अभ्यासातून दिसून आले आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लोक खूप काळ घरीच होते. त्यांचा संपूर्ण वेळ बेडरुम आणि लिव्हिंग रूममध्ये जात होता. मिटींगरुममध्ये घालवायचा वेळ झूम लिंक्सवर जाऊ लागला तर व्यायामाचा वेळ नेटफ्लिक्सवर चित्रपट, शोज पाहण्यात जाऊ लागला. त्यामुळे लोकांच्या हालचाली कमी झाल्या. ते बसून राहू लागले.

लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमधील किनेसियोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक जेकब मेयर म्हणतात, “बसून राहणं ही एक संकुचित वागणूक आहे. ही अशी गोष्ट आहे जी आपण विचार न करता करतो"

मार्च २०२० मध्ये ज्यावेळी कोरोनाची प्रादूर्भाव वाढला त्यावेळीच आम्हाला माहित झाले होते की, या साथीचा आपल्या वर्तनावर विचित्र परिणाम होणार आहे, ज्याचा आपण विचारही करु शकत नाही " असंही जेकब मेयर म्हणतात.

वेलबींग आणि एक्सरसाईज लॅबोरेटरी संचालक मेयर आणि त्यांची टीमने शारीरिक हालचाल आणि बसून राहणे यांचा मानसिक आरोग्याशी कसा संबंध आहे आणि यातील बदल लोकांचे विचार, भावना आणि जगाच्या आकलनावर कसा प्रभाव टाकतात याचं निरीक्षण केलं.

depression

depression

याचा अभ्यास करण्यासाठी मेयर आणि संशोधकांच्या टीमला सर्व 50 राज्ये आणि कोलंबिया जिल्ह्यातील 3,000 हून अधिक सहभागींचं सर्वेक्षण केलं. सहभागींनी दिवसभर काय केलं याची त्यांनी माहिती मिळवली. ते किती वेळ बसून राहिले, स्क्रीन पाहिली किंवा व्यायाम केला तसेच कोरोना येण्यापूर्वीच्या वर्तनाच्या तुलनेत सध्याचं वर्तन कसं होते याची माहिती त्यांनी मिळवली. मानक क्लिनिकल स्केलच्या संकेतानुसार त्यांनी त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये बदल देखील सूचित केले. (उदा. नैराश्य, चिंता, तणाव जाणवणे, एकटेपणा इ.).

"लोकांच्या शारीरिक हालचाली आणि स्क्रीन टाइममध्ये बदल त्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे हे आम्हाला माहिती होतं, परंतु आम्ही याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणातील लोकांचा डेटा पाहिला नव्हता", असं मेयर म्हणाले.

सर्वेक्षण डेटामध्ये असे दिसून आले की, यूएस शारीरिक क्रियाकलाप मार्गदर्शक तत्त्वानुसार काही सहभागींची शारिरिक हालचाली तब्बल 32 टक्क्यांनी कमी झाली. अशा सहभागींनी अधिक उदासीन, चिंताग्रस्त आणि एकटेपणाची भावना नोंदवली. मेयर आणि सहकाऱ्यांनी त्यांचे निष्कर्ष गेल्या वर्षी इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित केले.

फ्रंटीयर्स इन फिजिएट्री Frontiers in Psychiatry मधील वर्तमान पेपरने वेळोवेळी सहभागींचे वर्तन आणि मानसिक आरोग्य बदलले की नाही, हे पाहण्यासाठी पाठपुरावा केला. एप्रिल ते जून दरम्यान प्रत्येक आठवड्यात सहभागींनी समान निरीक्षणं नोंदवली.

दुसऱ्या अभ्यासात आढळले की, सरासरी आठ आठवड्यांच्या कालावधीत लोकांचे मानसिक आरोग्य सुधारले आहे. साथीच्या रोगात लोकांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं. परंतु ज्या लोकांच्या बसण्याच्या वेळा जास्त राहिल्या, त्यांची नैराश्याची लक्षणे, सरासरी, इतर सर्वांप्रमाणे सामान्य नव्हती. ज्या सहभागींनी त्यांच्या दिवसाचा बराचसा भाग बसून व्यतीत केला त्यांना मानसिक आरोग्यामध्ये कमी सुधारणा झाल्या, असं मेयर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, "हे शक्य आहे की जे लोक जास्त उदास होते ते अधिक बसून राहिले किंवा जे लोक जास्त वेळ बसून राहिले ते अधिक उदास झाले किंवा इतर काही घटक असू शकतात जे संशोधकांनी ओळखले नाहीत."

जून २०२० ते जून २०२१ पर्यंतचा मासिक सर्वेक्षण डेटा लवकरच सार्वजनिकपणे उपलब्ध होईल, असे सांगून मेयर म्हणतात, “हे नक्कीच अधिक तपासण्या योग्य आहे.” “मला वाटते की साथीच्या आजारादरम्यान आम्ही केलेल्या काही सूक्ष्म बदलांची जाणीव असणे आणि ते कसे फायदेशीर किंवा हानिकारक असू शकतात हे खरोखर महत्वाचे आहे कारण आपण साथीच्या जीवनाची दुसरी बाजू पाहत आहोत.”

ते सांगतात की, एखादी सवय लागली की ती मोडणे खूप कठीण असतात, पण हालचाल ही मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे हे समजून घ्यायला हवं. जरी तुम्हाला कामामुळे एका ठिकाणी बसून राहावं लागत असेल तरीही कामाच्या ब्रेकमध्ये थोडं चालायला हवं.

loading image
go to top