Health Trend 2021: निरोगी राहण्यासाठी लोकांचा होता सहा गोष्टींवर भर

२०२१ या वर्षीही कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे सावट आहे
health
healthesakal
Updated on

२०२१ या वर्षीही कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे सावट आहे. आता तर ओमिक्रॉनमुळे चिंता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे लोकं आरोग्य आणि फिटनेस (Health & Fitness) जपण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमविले. तर अनेकांना आरोग्याच्या कुरबुरींचा सामना करावा लागला. काहींना अनेक काळ खूप थकवा जाणवला. वजन घटणे असे शरिरावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी कॉमन होत्या. कोविड १९ नंतरच्या या गुंतागुंतामुळे लोकं आरोग्याविषयी अधिक जागरूक झाले. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस लोकं आरोग्याबाबत आणखी डोळसपणे विचार करत आहेत. त्यामुळेच २०२१ साली हेल्थ आणि वेलनेस ट्रेंडनी वर्षभर राज्य केले. या ट्रेंडवर एक नजर...

पर्सनल हेल्थ ट्रेकर्सनी वेधले लक्ष- आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टवॉचपासून हेल्थकेअर अॅप लोकांच्या जीवनशैलीचा भाग झाले आहे. अनेक लोकं आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही पैसे खर्च करण्यास तयार आहेत. ते पैसे खर्चून आरोग्याचा ट्रॅक ठेवणारे सर्वोत्तम गॅझेट घेत आहेत.  ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचे ठोके यांचा मागोवा घेणे हा आता लोकांचा नियम झाला आहे. या वर्षी लोकं त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क होते.
पर्सनल हेल्थ ट्रेकर्सनी वेधले लक्ष- आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टवॉचपासून हेल्थकेअर अॅप लोकांच्या जीवनशैलीचा भाग झाले आहे. अनेक लोकं आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही पैसे खर्च करण्यास तयार आहेत. ते पैसे खर्चून आरोग्याचा ट्रॅक ठेवणारे सर्वोत्तम गॅझेट घेत आहेत. ऑक्सिजनची पातळी आणि हृदयाचे ठोके यांचा मागोवा घेणे हा आता लोकांचा नियम झाला आहे. या वर्षी लोकं त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क होते. google
लक्षपूर्वक खाण्यावर भर- कोविड-१९ च्या काळात वजन कमी करणे ही लोकांसाठी गुंतागुंतीची गोष्ट होती. पण लोकांना ते कसे हाताळायचे ते समजले. २०२० सालचा भरपूर आणि सतत खाण्याचा ट्रेंड मागे पडला आणि यावर्षी लोकांनी लक्षपूर्वक खाण्यावर भर दिला. याचा अर्थ जंक फूड खाणे बंद झाले असे नाही. तर, लोकांनी खाण्याच्या सवयी संतुलित केल्या.
लक्षपूर्वक खाण्यावर भर- कोविड-१९ च्या काळात वजन कमी करणे ही लोकांसाठी गुंतागुंतीची गोष्ट होती. पण लोकांना ते कसे हाताळायचे ते समजले. २०२० सालचा भरपूर आणि सतत खाण्याचा ट्रेंड मागे पडला आणि यावर्षी लोकांनी लक्षपूर्वक खाण्यावर भर दिला. याचा अर्थ जंक फूड खाणे बंद झाले असे नाही. तर, लोकांनी खाण्याच्या सवयी संतुलित केल्या.google
health
थंडीत अळीवाचे लाडू खाताय! ऋजुता दिवेकर सांगतेय फायदे
हेल्थ सप्लिमेंट्स लोकांच्या घरी पोहोचले
लोकांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात आयुर्वेदिक आरोग्य पूरक सप्लीमेंट तसेच इतरही सप्लीमेंटचा समावेश करण्यास सुरुवात केली.  प्रतिकारशक्ती आणि उत्तम आरोग्याचा अतिरिक्त डोस हवा अनेकांना होता. यामुळे प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या वस्तू विकत घेण्यास अनेकांनी भर दिला.
हेल्थ सप्लिमेंट्स लोकांच्या घरी पोहोचले लोकांनी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात आयुर्वेदिक आरोग्य पूरक सप्लीमेंट तसेच इतरही सप्लीमेंटचा समावेश करण्यास सुरुवात केली. प्रतिकारशक्ती आणि उत्तम आरोग्याचा अतिरिक्त डोस हवा अनेकांना होता. यामुळे प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या वस्तू विकत घेण्यास अनेकांनी भर दिला. google
शारिरिक व्यायाम अविर्भाज्य -ऑनलाइन योगा, मॉर्निंग वॉक, वर्कआऊट्स आणि मेडिटेशन  अनेकांसाठी जगण्याचा अर्विभाज्य भाग झाला आहे. बहुतेकांना त्याचे महत्व कळले आहे. त्यामुळे कोविड -१९ काळात लोकांनी शारिरिक व्यायाम करण्यावर अधिक भर दिला. एवढेच नाही, तर ऑनाइन योगा आणि मेडिटेशन सेशन्सनी लोकांचे लक्ष वेधले.
शारिरिक व्यायाम अविर्भाज्य -ऑनलाइन योगा, मॉर्निंग वॉक, वर्कआऊट्स आणि मेडिटेशन अनेकांसाठी जगण्याचा अर्विभाज्य भाग झाला आहे. बहुतेकांना त्याचे महत्व कळले आहे. त्यामुळे कोविड -१९ काळात लोकांनी शारिरिक व्यायाम करण्यावर अधिक भर दिला. एवढेच नाही, तर ऑनाइन योगा आणि मेडिटेशन सेशन्सनी लोकांचे लक्ष वेधले. esakal
health
सकाळी कॉफी प्या, डोळे चांगले ठेवा
आरामदायी ठिकाणं लोकांच्या लिस्टमध्ये -
केवळ शारिरिक नाही तर मानसिक आऱोग्याबाबतही लोकं जागरूक होते. लोकं त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलू लागले. चर्चा करू लागले. रिलॅक्सिंग गेटवे पासून वर्क फ्री व्हेकॅशन करून मानसिक आरोग्य जपण्याकडे लोकांनी भर दिला.
आरामदायी ठिकाणं लोकांच्या लिस्टमध्ये - केवळ शारिरिक नाही तर मानसिक आऱोग्याबाबतही लोकं जागरूक होते. लोकं त्यांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलू लागले. चर्चा करू लागले. रिलॅक्सिंग गेटवे पासून वर्क फ्री व्हेकॅशन करून मानसिक आरोग्य जपण्याकडे लोकांनी भर दिला.google
health
फिरायला जाताय? आधी घराकडे लक्ष द्या
health
नोकरीसाठी मुलाखत देताय! या तीन महत्वाच्या गोष्टी करा
त्रास देणाऱ्या नोकऱ्या सोडणे कॉमन -एक काळ असा होता की, नोकरी सोडणे ही बाब फार कठीण होती. लोकांना त्रास होत होता पण आर्थिक गोष्टींसाठी लोकं नोकरीत त्रास सहन करत होते. पण २०२१ मध्ये लोकांना जान है.. तो जहान है या उक्तीप्रमाणे मानसिक आरोग्य चांगले असेल तर ते चांगले जगू शकतात हे जाणवले. त्यामुळेच लोकांनी मानसिक त्रास होत असणाऱ्या नोकऱ्या सोडून मानसिक आरोग्य जपायला प्राधान्य दिले.
त्रास देणाऱ्या नोकऱ्या सोडणे कॉमन -एक काळ असा होता की, नोकरी सोडणे ही बाब फार कठीण होती. लोकांना त्रास होत होता पण आर्थिक गोष्टींसाठी लोकं नोकरीत त्रास सहन करत होते. पण २०२१ मध्ये लोकांना जान है.. तो जहान है या उक्तीप्रमाणे मानसिक आरोग्य चांगले असेल तर ते चांगले जगू शकतात हे जाणवले. त्यामुळेच लोकांनी मानसिक त्रास होत असणाऱ्या नोकऱ्या सोडून मानसिक आरोग्य जपायला प्राधान्य दिले. Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com