गिफ्ट द्यायचंय? मग, जीमची मेंबरशीप द्या!

sonu sood interview about fitness in marathi
sonu sood interview about fitness in marathi

नायक असो अथवा खलनायक, चित्रपटातील दोन्ही भूमिकांमध्ये सोनू सूद परफेक्‍ट बसतो, त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याची भरभक्कम अशी देहयष्टी. याबाबतीत तरी सोनूची थेट आमीर, सलमानसोबत स्पर्धा होते, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. फिटनेस हाच माझा जीवनमार्ग असून, तो अगदी नैसर्गिकपणे माझ्याकडं आल्याचं तो सांगतो. 'हॅप्पी न्यू इअर', 'दबंग', 'तुतक तुतक तुतीया' आणि 'सिम्बा' हे सोनूचे चित्रपट विशेष चर्चेचा विषय ठरले होते. 

फिटनेस विषयीच्या बातम्या लेख वाचण्यासाठी ► क्लिक करा

स्वत:च्या फिटनेसच्या वेडाबाबत तो म्हणाला की, ''व्यायाम करीतच मी मोठा झालो, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कॉलजेच्या दिवसांमध्येच मी जीमच्या प्रेमात पडलो. जस-जसे दिवस जात गेले तसतसं मला त्याचं महत्त्व लक्षात यायला लागलं.'' तुम्ही जीवनात फिटनेसला प्राधान्य द्यायला हवं. त्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडं चालत येतील, असंही सांगतो. तसं पाहता फिटनेससाठी वेगळे नियम अथवा शिस्त लावून घेण्याची काही गरज नसते. तुम्ही सकाळी जसे रोज झोपेतून उठता, ब्रश करता आणि त्यानंतर कामाला लागता अगदी तसंच तुमचं फिटनेसचंही रुटीन बनायला हवं. ते तुमच्यापर्यंत सहज आणि नैसर्गिकपणे यायला हवं, हेदेखील तो सांगायला विसरत नाही.

फिटनेस विषयीच्या बातम्या लेख वाचण्यासाठी ► क्लिक करा

अभिनय दीर्घकालीन झुंज
अभिनेत्यांच्या आयुष्यामध्ये फिटनेसला खूप मोठं स्थान आहे. कारण, आम्हाला पडद्यावरही चांगलंच दिसावं लागतं. चित्रीकरणादरम्यान तुमच्या शारीरिक क्षमतेचा खऱ्या अर्थानं कस लागतो. कारण, येथे दीर्घकाळ तुम्हाला चिवटपणे झुंज द्यावी लागते. केवळ अभिनेताच नाही, तर प्रत्येक व्यक्तीनं फिट राहायलाच हवं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा; पण फिटनेस तुमच्याकडे हवाच. केवळ याच माध्यमातून तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तग धरू शकता, असा सल्लाही सोनू देतो. सोनू रोज व्यायाम करतो, यामध्ये धावणे, स्नायूंच्या विविध व्यायाम प्रकारांचा समावेश असतो. यातही अनेक उपप्रकार आहेत. यामुळे तुमच्या शरीराची सर्वार्थानं वेगानं हालचाल होते. हा व्यायाम तसा कठीण असला तरीसुद्धा मला त्यामुळे दिवसभर हलकंफुलकं वाटतं, असंही तो सांगतो.

फिटनेस विषयीच्या बातम्या लेख वाचण्यासाठी ► क्लिक करा

'ते' दोन तास महत्त्वाचे
सोनूचं वय सध्या ४६ वर्षं एवढं आहे. त्यानं हिंदी, तेलुगू, तमीळ आणि कन्नड अशा विविध भाषांमधील चित्रपटांत काम केलं आहे. आताही तो प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातून फिटनेसला प्रमोट करण्याचं काम करतो. चित्रपटामध्ये कधी तुम्हाला सडपातळ व्हावं लागतं तर कधी तुम्हाला तुमचे मसल अर्थात स्नायू दाखवावे लागतात. मीदेखील भूमिकेच्या गरजेनुसार आहार आणि व्यायामात बदल करतो. प्रत्यक्ष अभिनय करतानाही मला याचा खूप लाभ होतो, असं तो सांगतो. तुम्ही कधीच एक महिना, सहा महिने अथवा एका वर्षात फिट होऊ शकत नाही, असं सांगताना सोनू म्हणतो की, तुम्हाला यासाठी जीवनभर परिश्रम करणं गरजेचं असतं. एका दिवसामध्ये बावीस तास तुमच्या वाट्याला येतात. त्यातील केवळ दोन तास तुम्ही फिटनेसला द्यायलाच हवेत. तुम्ही कोणता व्यवसाय करता, कुठं नोकरी करता अथवा कुणासाठी काम करता, या सर्वच बाबी इथं गौण ठरतात. तुम्ही व्यायामासाठी दोन तास तरी राखून ठेवायलाच हवेत. तुम्ही धावा, जीममध्ये कसरती करा, काहीही करा; पण दोन तास आरोग्यासाठी द्याच.

Personality Development 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com