चेतना तरंग : ईश्वर एक बालक

तुम्ही नेहमी ईश्वराला पित्याच्या रूपात पाहिले आहे, जो वरती कुठे स्वर्ग नावाच्या स्थळी राहातो, पण तुम्ही त्याला एका बालकाच्या रूपात पाहू शकता का?
चेतना तरंग : ईश्वर एक बालक
Summary

तुम्ही नेहमी ईश्वराला पित्याच्या रूपात पाहिले आहे, जो वरती कुठे स्वर्ग नावाच्या स्थळी राहातो, पण तुम्ही त्याला एका बालकाच्या रूपात पाहू शकता का?

तुम्ही नेहमी ईश्वराला पित्याच्या रूपात पाहिले आहे, जो वरती कुठे स्वर्ग नावाच्या स्थळी राहातो, पण तुम्ही त्याला एका बालकाच्या रूपात पाहू शकता का?

तुम्ही ईश्वराला पिता मानता, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे अनेक मागण्या करता आणि काही ना काही घेण्याची अपेक्षा ठेवता. पण ईश्वराला बालक मानले, तर तुम्ही काही मागणार नाही.

ईश्वर हा तुमच्या अस्तित्वाचा गाभाच आहे. तुम्ही ईश्वरमय आहात. ईश्वराचा गर्भ तुमच्यात आहे. तुम्हाला त्या गर्भाची काळजी घ्यायला हवी आणि त्याला सुस्थितीत जन्म द्यायला हवा. बहुतेक लोक ईश्वराला जन्म देत नाहीत. जे जन्मदाते होतात. ते इच्छाही पूर्ण करू शकतात.

तुम्ही वृद्ध होऊन मरण पावेपर्यंत ईश्वर नावाचे एक बाळ तुम्हाला बिलगून राहाते. आणि पोषणासाठी रडत असते. पोषणासाठी त्याला सेवा, साधना आणि सत्संग हवे असतात.

प्रश्‍न : पण तुम्ही एका बालकापाशी प्रार्थना कशी करणार? आपल्या पित्यापाशी प्रार्थना करता येते.

श्री श्री : तुम्ही प्रार्थना करू का इच्छिता? तुम्हाला काय मागायचे आहे? एका चांगल्या पित्याला तर काय द्यायचे हे आधीच माहीत असते.

प्रश्‍न : पण मग समर्पण कसे करावे?

श्री श्री : एका बालकापाशी समर्पित होणे अधिक योग्य आहे, कारण मग त्याबरोबर मागण्या नसतील. तुमच्या बालक-ईश्वराची काळजी घ्या! नास्तिक लोक कोपऱ्यांमध्ये लपून पाहताहेत. संशय, अविश्वास आणि अज्ञान हे तुमच्या मनातले नास्तिक आहेत. म्हणून त्यांच्यापासून या बालकाचे संरक्षण करा!

तुम्ही कृपेतच आहात!

तुमच्या मनातील सर्व धारणांची बंधने तोडून द्या आणि तुमच्यावर ईश्वराची कृपा आहेच, हे जाणा. असे केल्याने तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्य लाभेल आणि मग ईश्वरकृपा वाहू लागेल.

तुमच्यावरील कृपेची जाणीव झाल्यावर

  • सर्व तक्रारी अदृश्य होतील

  • तुमची कुरकूर थांबेल

  • असुरक्षिततेची भावना नष्ट होईल

  • प्रेमाची अपेक्षा नाहीशी होईल

पण तुम्ही कृपेला समजून घेतले नाहीत तर मात्र कर्तेपण येईल.

जीवनामध्ये लक्षणीय बदल आणण्यासाठी कृपेची जाणीव ठेवा. विशेषत- ज्ञानसाधनेच्या या पथावरील तुम्ही सर्वांनी तरी या कृपेला ओळखले पाहिजे.

कृपेला जाणा. आत्मानुभवाची ही पहिली पायरी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com