चेतना तरंग : ज्ञानी संकटकाळातही आनंदी!

जे सेवा करतात त्यांचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. दुष्काळाच्या अथवा युद्धाच्या काळात ‘रेड क्रॉस’ संघटनेचे लोक व्यवस्थित असतात, कारण ते सेवा करीत असतात.
Sri Sri Ravi Shankar
Sri Sri Ravi ShankarSakal
Summary

जे सेवा करतात त्यांचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. दुष्काळाच्या अथवा युद्धाच्या काळात ‘रेड क्रॉस’ संघटनेचे लोक व्यवस्थित असतात, कारण ते सेवा करीत असतात.

जे सेवा करतात त्यांचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. दुष्काळाच्या अथवा युद्धाच्या काळात ‘रेड क्रॉस’ संघटनेचे लोक व्यवस्थित असतात, कारण ते सेवा करीत असतात. ते लोक इतर ग्रस्त लोकांपर्यंत जेवढे समाधान पोचवू शकतात, तेवढेच ते अधिक आनंदी होतात. उलटपक्षी केवळ स्वतःचाच विचार करणारे, उपभोगात मग्न असलेले लोक सुखाच्या दिवसातसुद्धा आतून दुःखी कष्टी असतात.

चांगल्या दिवसांत लोक अनेकदा अगदी क्षुल्लक गोष्टींवर आपला आनंद हरवून बसतात. पार्टीचे यजमान अनेकदा पार्टीचा आनंद घेऊ शकत नाहीत, कारण काहीतरी राहून गेल्याची खंत त्यांना बोचत राहते. कदाचित कुणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले, कुणी बोलावूनही आले नाही, आयोजनात काहीतरी गडबड झाली, इत्यादी बाबी असतात. एक ज्ञानी व्यक्ती वाईट दिवसांमध्येदेखील आनंदात असते. एक मूर्ख अडाणी व्यक्ती चांगल्या दिवसातदेखील दुःखी असते.

कोणताही काळ हा तुम्हीच चांगला अथवा वाईट बनवत असता. लोक सहसा वाईट काळाला दोष देऊन चांगल्या काळाची प्रतीक्षा करीत असतात. पण अगदी एका ज्योतिष्याने तुमचा समय अतिशय खराब चालला आहे, असे सांगितले तरी तो काळ तुम्ही चांगला करू शकता.

हवामानाप्रमाणेच काळाचाही तुमच्यावर प्रभाव पडत असतो. तुमचा सत्संग आणि तुमची साधना अशा वेळी तुमचे संरक्षण करीत असते. तुम्ही समयाहून अधिक विशेष आहात आणि ईश्वराशी असलेल्या तुमच्या समयातीत संबंधांच्या साहाय्याने तुम्ही सर्व काळातून सहजतेने मार्गक्रमण करू शकाल. हे जाणणे आवश्यक आहे. मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांबद्दल लोकांमध्ये चर्चा करण्यात लाजण्यासारखे काही नाही. अशा विषयांवर बोला. सगळ्या जगाला जागे करण्याची आता वेळ आली आहे.

सगळ्यांच्या हाका येत आहेत

अध्यात्माचा रथ निघाला आहे

काळाचे जाते दळतच आहे

आत्मा जाणण्यास अधीर आहे...

पुनर्नवे व्हा, आनंदी रहा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com