चेतना तरंग : अहिंसेचा गोंगाट

सहसा हिंसेबरोबर खूप आवाज, गदारोळ असतो. अहिंसा शांततेत घडत असते. हिंसक लोक खूप गोंगाट करतात, आरडाओरडा करून ते आपले कृत्य जाहीर करत असतात.
Sri Sri Ravishankar
Sri Sri RavishankarSakal
Summary

सहसा हिंसेबरोबर खूप आवाज, गदारोळ असतो. अहिंसा शांततेत घडत असते. हिंसक लोक खूप गोंगाट करतात, आरडाओरडा करून ते आपले कृत्य जाहीर करत असतात.

सहसा हिंसेबरोबर खूप आवाज, गदारोळ असतो. अहिंसा शांततेत घडत असते. हिंसक लोक खूप गोंगाट करतात, आरडाओरडा करून ते आपले कृत्य जाहीर करत असतात. अहिंसक लोक शांत राहतात, पण आता अशी वेळ आली आहे की अहिंसक लोकांनी खूप आवाज उठवावा, गोंगाट करावा, ज्याने मग हिंसाच थोडी शांत पडेल! अहिंसेचा संदेश स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. अगदी छोट्या वयापासून अहिंसेचे संस्कार बिंबवणे आवश्यक झाले आहे.

क्रोध आणि हिंसात्मक कृत्यांशी एक शरमेची, अपराधी भावना जोडली गेली पाहिजे. सध्या तरुण मुलांमध्ये क्रोध, हिंसा यांच्याबरोबर एक अभिमानाची, गर्वाची भावना जोडलेली आहे, असे दिसते. त्यात अपराधी भाव अथवा लज्जा कुठेच नाही. आपण हिंसक आणि रागीट आहोत, याचा लोकांना मोठा अभिमान वाटतो. आक्रमक असणे हे मानाचे लक्षण आहे, असा एक सर्वसामान्य समज झाला आहे.

आक्रमक भूमिका घेणे हे लाज वाटण्यासारखे कृत्य आहे, असे कुणालाही वाटत नाही. त्यामुळे आक्रमकतेचा आणि हिंसेचा समाजामध्ये पुरस्कार केला जात आहे. आक्रमकता आणि हिंसेला सन्मान मिळाल्यावर मानवी मूल्ये निस्तेज होत जातात. काही चित्रपटांमधून आणि नव्या प्रकारच्या काही संगीतामधून देखील नैराश्य, क्रोध, बदल्याची भावना आणि या सर्वातून येणारी हिंसा यांचा पुरस्कार केल्याचे, त्यांचे समर्थन केल्याचे दिसते आणि तरुण मुलांच्या नजरेत असेच लोक आजकाल आदर्श बनत आहेत.

मानवी मूल्यांचा पुरस्कार आपण मोठ्याने आणि स्पष्टपणे करणे गरजेचे आहे. प्रेम, करुणा आणि आपलेपणाची भावना यांचे अनन्यसाधारण महत्त्व नव्या पिढीला पटवून द्यायला हवे. लोकांच्या समूहापुढे, स्थानिय वृत्तपत्रांमधून आणि टीव्हीवर या विषयावर बोलत राहा आणि तुमच्या क्षेत्रामध्ये जमतील तेवढे अधिक आर्ट एक्सेल (मुलांसाठी) आणि आर्ट ऑफ लिव्हिंग बेसिक कोर्स (प्रौढांसाठी) होतील असे प्रयोजन करा.

डेव्हिड : जर लोकांना क्रोधित होण्याची लाज वाटली, तर ते अस्वाभाविक वागणार नाहीत का? यामुळे त्यांच्या अंतरंगात जो प्रतिरोध दाबला जात राहील, तो वाईट नाही का?

श्री श्री : त्यांना लाजच वाटली नाही, तर क्रोधाचा आणि हिंसेचा त्यांना परवाना मिळाला असावा, असे ते वागतील. प्रतिरोध नेहमीच वाईट नसतो. काहीवेळा तो चांगलाही असतो, जसा आजारांना आणि वाईट सवयींना केलेला प्रतिरोध.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com