Happy Birthday Sushmita : म्हणून सुश्मिता आहे 'या'ही वयात फीट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

वय कितीही असो, तुम्हाला स्वतःला फिट ठेवण्याची आवड असली पाहिजे. मला वर्कआऊट आणि डाएट या दोन्हीची आवड आहे. सतत वर्कआऊटचे विविध प्रकार करत राहायला मला आवडते.

वय कितीही असो, तुम्हाला स्वतःला फिट ठेवण्याची आवड असली पाहिजे. मला वर्कआऊट आणि डाएट या दोन्हीची आवड आहे. सतत वर्कआऊटचे विविध प्रकार करत राहायला मला आवडते. खाताना जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ पोटात कसे जातील, हे मी पाहत असते. सकाळी उठल्यावर मी ग्लासभर कोमट पाणी आणि एक वाडगाभर फळे खाते. त्यानंतरच्या नाश्‍त्यामध्ये मी सहा अंड्यांच्या पांढऱ्या भागापासून बनलेल्या फ्रेंच टोस्ट खाते, असे सुश्मिताने सांगितले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दुपारच्या जेवणात मी डाळ, भाजी, मासे, २ चपात्या आणि अगदी थोडासा भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी भाज्यांचा ज्युस आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात अर्धी वाटी डाळ आणि दही खाते. कधीकधी मी दह्याऐवजी कांदा-काकडीचा रायता किंवा भाज्यांचा रायता खाते. दर दोन तासांनी खाण्याकडे माझा कल असतो. त्यामुळे मी माझे खाण्याचे वेळापत्रक अशा पद्धतीने आखले आहे. 

मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. यासाठी मी  योगाचा आधार घेते. वर्कआऊटमध्ये मी स्विमिंग, नृत्य असे अनेक प्रकार करते. 

जीमला गेल्यावर मी कार्डिओ करण्याला पसंती देते. एरीअल सिल्क हा नृत्याचा  प्रकार मला करायला आवडतो. त्यामुळे शरीर लवचिक राहते. मी कधीच जीम  चुकवत नाही. जीमला जाणे न जमल्यास स्विमिंगला जाते. स्विमिंग हा उत्तम  नैसर्गिक व्यायाम आहे. योगा करणे आवडत असल्याने मी कशाचा आधार न घेताही शीर्षासन करू शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushmita sen actress fitness