सकाळच्या या पाच सवयी तुम्हाला आयुष्यभर ठेवतील फिट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

प्रत्येक व्यक्तीने सकाळी करायला हवीत. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण केल्या तर आपले आयुष्य बदलून जाईल. जाणून घेऊया ती ५ कामे जी प्रत्येक व्यक्तीला करायला हवीत.

पुणे : आपल्याला जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर आपले आरोग्य चांगले असायला हवे. ही बाब सर्वात महत्वाची आहे.  प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात करतो. कोणी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असतो तर कोणी जिमला जातो. मात्र अशी काही कामे आहेत जी प्रत्येक व्यक्तीने सकाळी करायला हवीत. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण केल्या तर आपले आयुष्य बदलून जाईल. जाणून घेऊया ती ५ कामे जी प्रत्येक व्यक्तीला करायला हवीत.

व्यायाम करा
जिमला जाण्याची वेळ नसेल तर सूर्य नमस्कार सारखा योग घरातच करा. ताण आणि चिंता कमी करण्यासाठी दररोज ध्यान करणेदेखील गरजेचे आहे. नियमित चालण्याचे व्यायाम करून आपण शरीराची सक्रियतादेखील वाढवू शकता. विविध योगासनातून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करा.

Hope of life! कर्करोग! उपचाराचा खर्च वार्षिक कमाईपेक्षा पाच पटीने अधिक

नाष्टा गरजेचा
सकाळच्या न्याहारीने शरीराला ऊर्जा मिळते. नाष्टा न केल्यामुळे कामात मन न लागणे, बेचैन होणे चिडचिड देखील होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी विटॅमिन्स, मिनरल्स, अॅंटिऑक्सिडेंट्स असलेले पदार्थ घ्या. न्याहारीत नेहमी दलिया, पोहे, इडली-सांभर, फ्रूट घ्या यातून तुम्हाला पोषक तत्त्व मिळते आणि तुम्ही दिवसभर एनर्जीटिक राहता.

कोमट पाणी प्या
सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायला हवे. पाणी पिण्याची ही सवय लावून घ्यायला हवी. घरातल्या प्रत्येकाला तसे करायला सांगायला हवे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने पोटातील आजार दूर होतात. बद्धकोष्ठता दूर होते. याची सुरुवात आजपासूनच करा.

मुळा खाल्यानंतर चुकुनही खाऊ नका 'या' चार गोष्टी; विषाप्रमाणेच ठरतील...

भिजलेले बादाम घ्या
रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठल्यानंतर खाण्याची सवय लावा. बदामांसह अक्रोडदेखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यातून शरीराला भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने मिळते. शिवाय स्नायू मजबूत करण्यास मदत करते.

विचार बदला
सकाळ हाेताच आजचा दिवस चांगला जाईल असा विचार करा. काही अडचण असेल तर त्यावर उपाय शोधा, नक्कीच प्रश्न सुटेल.

Hope of life! स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि त्यावरील उपचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These five morning habits will keep you fit and healthy throughout your life