esakal | पोटातील गॅसपासून सुटका हवीय? मग घरच्याघरी करा 'हे' व्यायाम

बोलून बातमी शोधा

stomach
पोटातील गॅसपासून सुटका हवीय? मग घरच्याघरी करा 'हे' व्यायाम
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नागपूर : कोरोनामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झाले आहे. त्यामुळे वर्कआउट्स, मॉर्निंग वॉक आणि बाहेर पळायला जाणे या गोष्टी जवळपास बंद झाल्या आहेत आपण सर्वजण घरून काम करत आहोत आणि आणखी काही दिवस परिस्थिती अशीच राहील. त्यामुळे घरच्या घरी कसे व्यायाम करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घरच्याघरी हे व्यायाम केल्यास पचनसंस्था चांगले काम करते. तसेच दिवसभर कामाला बसण्यास देखील कंटाळा येत नाही. यामुळे गुडघेदुखी किंवा मायग्रेनने ग्रस्त असलेल्या लोकांना देखील फायदा होतो. मग चला तर पाहुयात हे तीन व्यायाम

विपरीत करणी -

यामध्ये भिंतीच्या सहाय्याने व्यायाम करा. हा व्यायाम करताना तुमचे खांदे हे भिंतीच्या दिशेने खाली जातात का याकडे लक्ष द्या.

पहिली पोझिशन घेत पाय हळूहळू वर न्या. जिथपर्यंत तुम्हाला हे पाय नेता येईल तिथपर्यंत न्या. यामुळे पायावर येणारी सूजना, गुडघ्यातील दुखणे तसेच पाठीच्या मागच्या भागात दुखणे या सर्व समस्या दूर होतात.

तिसऱ्या पोझिशनमध्ये दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडा. यामुळे पाचनसंस्था सुधारण्यास मदत होईल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)