लहान मुलांच्या उलटीवर घरगुती उपाय हवा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी 

Useful home remedies for child vomiting
Useful home remedies for child vomiting

मोठ्यांना जर उलटीचा त्रास सतावत असेल तर लहान मुले कसे करत असतील? चुकीचा आहार, प्रवासादरम्यान किंवा बदलत्या हवामानामुळे मुले नेहमी उलटीने त्रस्त असतात. वांरवार उलटी होत असल्याने मुलांची तब्येत आणखी खराब होऊन जाते. अशा स्थितीत त्यांची उलटी थांबवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. स्वयंपाक घरात ठेवलेल्या काही वस्तूंनी ती थांबवणे सोपे होऊ शकते. जर तुमच्या घरीही लहान मुले आहेत. चुकीचे खाणे, प्रवास करणे किंवा इतर अन्य समस्यांमुळे उलटी करतात. तुम्ही या घरगुती उपायांच्या मदतीने या त्रासापासून सहज सुटका करु शकता. 

इलायचीचा वापर करा

भारतीय घरांमध्ये इलायचीचा वापर चहापासून स्वादिष्ट स्वयंपाक बनवण्यापर्यंत केला जातो. हेच नाही. या व्यतिरिक्त इलायचीचा इतर अन्य कारणांसाठी महिला वापर करित असतात. इलायची पावडर आणि मध एकत्र करुन मुलांना खाण्यास देऊ शकता. यामुळे त्यांना लवकर आराम मिळेल. 

पुदिन्याचा रस 

मोठ्या माणसांना पुदिन्याचा रस घ्यायला काही होत नाही. पण कडू असल्याने लहान मुल घ्यायला मागेपुढे करतात. या व्यतिरिक्त तुम्ही पुदिन्याचे रस मधातही एकत्र करुन मुलांना देऊ शकता. याच्या सेवनाने उलटी रोखली जाऊ शकते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. 

भाताचे पाणी

तुम्हाला वाटते असेल की भाताचे पाणी उलटीवर कसा उपाय ठरु शकतो? तुमची ही शंका चुकीची आहे. कारण भाताच्या पाण्याने उलटी थांबवली जाऊ शकते. दिवसभरातून एकदा दोनदा भाताचे पाणी लहान मुलांना द्या. त्यामुळे उलटी होणार नाही. तसेच पचनक्रिया व्यवस्थित राहते. भाताच्या पाण्यामुळे पोटातील गॅसेसही दूर केले जाऊ शकते. या पाण्यात अनेक जीवनसत्त्व असतात, जे की मुलांना आजारांशी लढण्यासाठी मदत करतात. 

अद्रकचा वापर करा

अद्रकचा चहा एखाद्याला मिळाला नाही तर त्याच्या दिवसाची सुरूवात खराब होते. असो चहा व्यतिरिक्त अद्रकच्या मदतीने उलटी थांबवली जाऊ शकते. यासाठी तुम्ही अद्रक पावडर उकळत्या पाण्यात टाकून मुलांना पिण्यास देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही अद्रक रसही उकळत्या पाण्यात टाकूनही मुलांना देऊ शकता. मात्र मुलांना अधिकच त्रास होत असेल तर तुम्ही डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com