योगा लाइफस्टाइल : नीरक्षीरविवेकबुद्धीच्या वाढीसाठी...

योगा लाइफस्टाइल : नीरक्षीरविवेकबुद्धीच्या वाढीसाठी...

श्रेय आणि प्रेय यांच्या द्वंद्वातच योग आपल्याला मदत करतो. योग केवळ आपल्या शरीरालाच नव्हे तर मनाला आणि आत्म्यालाही अंतर्बाह्य समतोल, शुद्ध, निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतो. आयुष्यात एखादा निर्णय घेताना लागणारे खंबीर मन, त्याची तितक्याच कणखरपणे अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे तंदुरुस्त शरीर आणि मन व शरीराला आवश्यक असणारी स्वान्तसुखायता योग आपल्याला मिळवून देतो, हे मागच्या भागात पाहिले. 

एखाद्याचे मन दुखावून अथवा त्याला शारीरिक इजा पोचवून केलेली हिंसा जशी योग जीवनपद्धतीच्या विरूद्ध आहे, त्याचप्रमाणे आपल्या स्वतःच्या मन आणि आत्म्याच्या विरोधात केलेली कृतीदेखील योग जीवनपद्धतीच्या विरोधातच आहे. खरेतर, तुमच्या आध्यात्मिक प्रेरणेच्या विरोधात जाऊन स्वतःला इजा पोचविणे दुसऱ्याला इजा पोचवण्यापेक्षा अधिक हिंसक आहे... अहिंसेप्रमाणेच सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य योग जीवनपद्धतीतील यम आहेत. लौकिकार्थाने प्रेय न वाटणाऱ्या या गोष्टी योगाच्या माध्यमातून आपल्या शरीर आणि आत्म्याला जोडण्याचं काम करतात, म्हणजेच तुमच्या आत्म्याचा योगा.

योग केल्याने आपले क्लेश कमी होतो. म्हणजेच, श्रेय आणि प्रेय ओळखण्याची आपली नीरक्षीरविवेकबुद्धी वाढण्यास  मदत होते. काय योग्य आहे आणि काय नाही हे ओळखून योग्य निवड करण्याचे ज्ञान प्राप्त होते. योगामुळे व्यक्तिमत्त्वात आणि विचारांत बदल होण्याची ही एक हळूवार प्रक्रिया आहे. महात्मा गांधींनीदेखील योगाचे पाच यम आयुष्यात अंगीकारले होते. महर्षी पतंजलींनी पाया रचलेल्या या योगाचे आसन, प्राणायाम, प्रत्यहारा, धारणा, ध्यान आणि समाधी हे पाच नियम आहेत. आसनांना महत्त्व देऊन बरेचदा बाकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तथापि, योगाचे आठ प्रकार अंगीकारल्यास आयुष्यात पूर्णत्व प्राप्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल होऊ शकते.

हे लक्षात असूद्या...
मन आणि आत्म्याच्या विरोधातील कृती योगाच्या विरोधातच.
सत्य, अस्तेय, अपरिग्रह, 
ब्रह्मचर्य योगातील यम.
योगाने क्लेश कमी होतो, 
नीरक्षीरविवेक वाढतो. 
योगाने व्यक्तिमत्त्वात बदल ही हळुवार प्रक्रिया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com