हेल्थ वेल्थ : लपलेली साखर कशी शोधायची? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar
हेल्थ वेल्थ : लपलेली साखर कशी शोधायची?

हेल्थ वेल्थ : लपलेली साखर कशी शोधायची?

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

वजन कमी करण्याचा आणि तंदुरुस्त होण्याचा विचार येतो, तेव्हा साखर कमी करणे आपल्या ‘करायलाच हवं’ यादीत प्रथम येते. साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण आपल्या आवडत्या मिठाया, चॉकलेट्स, शेक आणि केक वगळू लागतो, बरोबर? ही एक चांगली सुरुवात आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की आपण नकळत देखील साखर खातो. आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांमध्ये साखर दडलेली असते. मी तुम्हाला फूड पॅकेट्स, पेये आणि इतर प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये साखर शोधण्याचे मार्ग समजावून सांगणार आहे.

साखरेचे दोन प्रकार

नैसर्गिक साखर : ही आपल्या अन्नामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारी साखर आहे. बहुतेक फळांमध्ये कमी-अधिक प्रमाणात नैसर्गिक साखर असते. आंबा, द्राक्षे, टरबूज आणि अंजीरामध्ये जास्त साखर असते, तर अॅव्होकॅडो इत्यादींमध्ये कमी साखर असते. मात्र, या सर्व फळांमध्ये आढळणारी साखर नैसर्गिक असते.

पांढरी साखर : ही साधारणपणे ऊस आणि बीटरूटमधून काढली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून नंतर अन्नात मिसळली जाते. ही साखर बहुतेक प्रक्रिया केलेले पदार्थ आणि पेयांमध्ये आढळते. प्रक्रियेदरम्यान, त्यांचे गुणधर्म बदलतात आणि अन्नातील इतर अनेक पोषक द्रव्ये काढून टाकतात. या साखरेला फक्त वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.

पोषण लेबलवर लपलेली साखर शोधणे

पोषण लेबल ही विशिष्ट उत्पादनाच्या ठराविक प्रमाणात दिलेल्या खाद्य पदार्थामध्ये किती कॅलरीज आणि पोषक तत्वे उपस्थित आहेत, हे दर्शवितात. ह्या टेबलवरील सर्व माहिती एका वेळी किती प्रमाणात तुम्ही तो पदार्थ खाता त्यावर अवलंबून आहे.

पोषण लेबलमध्ये सर्व पोषक घटक उतरत्या क्रमाने असतात त्यामुळे जर साखर लेबलवर प्रथम किंवा द्वितीय क्रमांकावर असेल, तर याचा अर्थ उत्पादनामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे.

वरील पोषण लेबलमध्ये संत्र्याचा रस आहे. यात एकूण साखरेचा एक भाग (२५ ग्रॅम) समाविष्ट आहे आणि त्याच्या खाली, तुम्ही साखर (२३ ग्रॅम) पाहू शकता. ह्या संत्र्याच्या रसात असलेली एकूण साखर ही नैसर्गिक आणि अजून, भर घातलेली पांढरी साखर दोन्ही मिळून असते. लेबलचा अर्थ आहे, की ह्या रसात २५ ग्रॅम साखर आहे आणि त्यापैकी २ ग्रॅम नैसर्गिक साखर आहे आणि २३ ग्रॅम पांढरी साखर नंतर घालण्यात आली आहे.

तसेच, संपूर्ण बाटलीमध्ये फक्त २५ ग्रॅम साखर आहे असा विचार करून फसवणूक करू नका. वरील लेबल अधिक तपशीलवार वाचू या - एकूण बाटली २४० ग्रॅम x ८ = १९२० ग्रॅम म्हणजे जवळपास २ लिटर आहे. याचा अर्थ असा आहे की या एका बाटलीत एकूण साखर २५ ग्रॅम x ८ = २०० ग्रॅम आहे. आता याचा विचार करा, जर तुम्ही एकाच वेळी अर्धी बाटली प्यायली तर तुम्ही १०० ग्रॅम साखर एका वेळी खाताय जी दररोज शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा ३ पट जास्त आहे. एक ग्रॅम साखर ४ किलो कॅलरी देते आणि जर तुमच्याकडे १०० ग्रॅम असेल तर तुम्ही ४०० किलो कॅलरीचे सेवन फक्त साखरेद्वारे केले आहे.

काही उत्पादने साखरेचे प्रमाण दर्शवितात, तर काही उत्पादने अशी आहेत जी शून्य साखर दर्शवतात, परंतु तरीही त्यात साखर असते. उदाहरणार्थ, हे उत्पादन ० पांढरी साखर दर्शवते, परंतु तरीही त्यात माल्टिटॉल सिरप आहे जो साखरेचे अल्कोहोल रूप असून साखरेचाच पर्याय आहे.

कधीकधी साखरेचे प्रमाण दर्शवले जात नाही. ते तपासण्यासाठी तुम्ही उत्पादनात लपलेली साखर शोधण्यासाठी घटक विभागात खाली जाऊ शकता. वरील पोषण लेबलमध्ये, तुम्ही पाहू शकता की सुक्रोज, ग्लुकोज आणि उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप या उत्पादनांमध्ये लपलेली साखर आहे. पुढे, संत्र्याच्या रसाच्या पोषण लेबलमध्ये (घटकांच्या विभागात), तुम्ही पाहू शकता की कॉन्सर्ट्रेटेड संत्र्याचा रस उत्पादनाला गोड करण्यासाठी वापरला आहे.

लपलेली साखर अनेक वेगवेगळ्या नावांनी आपल्या दृष्टीस पडू शकते पण स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, कारण आपले शरीर सर्व प्रकारच्या साखरेवर एकाच प्रकारे प्रक्रिया करते. पांढऱ्या साखरेच्या दैनिक मूल्याची (DV) टक्केवारी व्यक्तीपरत्वे बदलते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने शिफारस केली आहे की साखर दररोज शरीरात जाणाऱ्या कॅलरीज पैकी ६ टक्क्यांपेक्षा जास्त जाऊ देऊ नये.

लपलेल्या साखरेची वेगवेगळी नावे

साखरेची सुमारे ६० वेगवेगळी नावे आहेत. येथे काही लोकप्रिय टिप्स आहेत, ज्या तुम्हाला तुम्ही खरेदी केलेल्या उत्पादनांमध्ये लपवलेली साखर ओळखण्यात मदत करू शकतात.

‘-ose’ मध्ये समाप्त होणारे शब्द - सुक्रोज, फ्रुक्टोज, डेक्सट्रोज, माल्टोज.

कॉन्सन्ट्रेट्स

माल्ट सिरप, हातसडीच्या तांदळाचे सिरप आणि मॅपल सिरप सारखे सिरप. बाष्पीभवन केलेला उसाचा रस, फळांचा रस आणि साधा उसाचा रस.

साखरेचे प्रमाण कमी करण्याचा एक चांगला नियम म्हणजे भरपूर साखर असलेली उत्पादने टाळणे किंवा साखर हा पहिला किंवा दुसरा घटक असलेले अन्नपदार्थ टाळणे. शिवाय, कुठलेही उत्पादन साखरमुक्त, नैसर्गिक, आरोग्यदायी किंवा पदार्थामध्ये साखरच नसल्याचा दावा करणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका. या उत्पादनांमध्ये उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप, माल्टोज इत्यादी साखरेचे इतर प्रकार असतात.

Web Title: Vikas Sinh Writes Health Wealth Sugar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health newssugarWealth
go to top