Diabetes | 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वाढू शकतो मधुमेहाचा धोका

शरीरात इंसुलिनची (Insulin) योग्य पातळी न राखली गेल्यास मधुमेह (Diabetes) होऊ शकतो.
diabetes
diabetesesakal

मधुमेही लोकांना आहाराच्या बाबतीत खूपच जागरूक राहावं लागतं. खाण्यापिण्यासोबतच इतर जीवनशैलीत सुद्धा सुधारणा करावी लागते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणारा एक हार्मोन म्हणजे इन्सुलिन होय. शरीरात इंसुलिनची (Insulin) योग्य पातळी न राखली गेल्यास मधुमेह (Diabetes) होऊ शकतो. अलीकडेच झालेल्या एका अभ्यासानुसार डी जीवनसत्त्वाच्या (Vitamin D) अभावामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, हे समोर आलंय.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेहाचा धोका-

आजकाल खुप लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. मधुमेहापासून होणाऱ्या त्रासापासून दूर राहायचं असेल तर आहाराच्या बाबतीत खूपच जागरूक राहावं लागतं. अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे देखील मधुमेह (Diabetics) होऊ शकतो. शरीरातील ग्लुकोजची पातळी खूप वाढल्यास मधुमेह ही एक गंभीर स्थिती बनते. या स्थितीत शरीराला आवश्यक तेवढे इन्सुलिन तयार करता येत नाही किंवा शरीराच्या पेशी इन्सुलिनवर (Insulin) प्रतिक्रिया देत नाहीत.

सूर्यप्रकाशः व्हिटॅमिन डी'चा सर्वोत्तम स्त्रोत

सूर्यप्रकाश हा 'व्हिटॅमिन डी'चा सर्वोत्तम स्त्रोत आहे. जेव्हा सूर्यप्रकाश तुमच्या त्वचेवर पडतो, तेव्हा तुम्हाला त्यातून व्हिटॅमिन डी मिळते. याशिवाय अनेक खाद्यपदार्थांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व असते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेहासारख्या गंभीर आजाराला निमंत्रण मिळू शकते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.

रक्तातील साखरेची पातळी आणि इंसुलिन-

Diabetes.co.uk च्या मते, शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणारा एक हार्मोन म्हणजे इन्सुलिन होय. शरीरात इंसुलिनची योग्य पातळी न राखली गेल्यास मधुमेह होऊ शकतो. टाइप 2 मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिनवर प्रतिक्रिया देत नाही.

व्हिटॅमिन डी'ची योग्य पातळी-

अभ्यासात असेही म्हटले आहे की, व्हिटॅमिन डीची पातळी व्यक्तीनिहाय बदलू शकते. प्रत्येकासाठी व्हिटॅमिन डीची पातळी समान असणे आवश्यक नाही. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात व्हिटॅमिन डीचे पुरेसे प्रमाण इंफ्लामेशन कमी करते. हे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवण्यास मदत करते.

जेव्हा तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते, तेव्हा शरीरात होणार्‍या अनेक प्रक्रिया मंदावू लागतात. त्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज काही वेळ उन्हात बसणे उपयुक्त ठरू शकते. यामुळे हाडे आणि स्नायूही मजबूत राहतील.मासे, कॉड लिव्हर ऑइल, मांस आणि अंड्यातील पिवळे बलक यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असते.

या गोष्टींची काळजी घ्या-

व्हिटॅमिन डी शरिरासाठी कितीही चांगले असले तरी त्याच्या प्रमाण योग्य असणे महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. दीर्घकाळापर्यंत व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्याने शरीरात खूप जास्त कॅल्शियम तयार होते. त्यामुळे हाडे कमकुवत होण्यासोबतच किडनी आणि हृदयालाही नुकसान पोहोचू शकते. तज्ज्ञांच्या मते, सप्लिमेंट्सऐवजी कोवळ्या सूर्यप्रकाशाद्वारे व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल. जर तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल, तर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com