शतपावली करा अन् स्वस्थ जीवन जगा

Walk
WalkWalk

नागपूर : आजार पळविण्यासाठी केवळ औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन घेणे अथवा बाटल्या रिचवणे गरजेजे आहे असे नाही. कारण, कित्येक आजार हे मानवाच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे जडत आहेत. असे असले तरी यावर उपायही आहेत. शतपावली हा एक उपाय हृदयरोग, मधुमेह, स्थूलता, ताण आदी आजारांना दूर ठेऊ शकतो अथवा नियंत्रणात आणू शकतो. ‘शतपावली’चा मोठा आरोग्यदायी फायदा शरीराला होत असल्याचे वैद्यक तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेतून पुढे आले.

रात्रीच्या शतपावलीमुळे विशेषतः आपली झोपण्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणातील अंतर वाढते, जे शरीरासाठी आवश्यक आहे. जीवनशैलीत केलेल्या बदलातूनही आजारांशिवाय सहज, सामान्य जीवन जगू शकतात. कामाचा ताण, रोगट जीवनशैली आणि प्रदूषित अन्नाचे सेवन, व्यायामाचा अभाव अशा विविध प्रकारच्या त्रासांमुळे कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण मिळते.

Walk
शवगृहात १०० मृत महिलांशी शारीरिक संबंध; बनवले व्हिडिओ

रात्रीच्या शतपावलीने बद्धकोष्ठता कमी होऊन पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. शतपावली आपले शरीर चांगल्या स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अलीकडे डॉक्टरकडे जाण्यापेक्षा ‘गुगल’वर सर्च करीत आजाराची चौकशी करण्याचा आणि औषधे घेण्याचे प्रमाण वाढले. यामुळे अनेकदा डॉक्टरांविषयी संभ्रम निर्माण होण्याची भीती तज्ज्ञानी व्यक्त केली आहे.

शहरी आजाराचा विळखा

शहरात सध्या श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच तीन लाखांपेक्षा दमा आजार असलेले रुग्ण आहेत. मधुमेह असलेल्यांचा आकडा तर साडेतीन लाखांपेक्षाही जास्त आहे.

हवेतील प्रदूषणात वाढ

दिवाळीच्या दिवसांमध्ये शहरातील प्रदूषणात चांगलीच वाढ झाली. ४ आणि ५ नोव्हेंबरला नोंदविलेल्या वायुप्रदूषणाचा आकडा नागपूरकरांसाठी भयावह होता. फटाके फोडल्याने कार्बन मोनोऑक्‍साइड, अमोनिया, बेन्झिन, आर्सेनिक, निकेल धातूचे कण हवेत मिसळल्याने रात्रीला गडद धुके पडले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील प्रदूषणाचे प्रमाण १७५.८० तर बलिप्रतिपदेला हा आकडा १८१.१८ पार्टिक्युलेट मॅटरपेक्षाही जास्त होता.

Walk
माझे नाव एवढे घेतले जाते की २४ तासांपैकी २ तास उचक्या लागतात
रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने आपली पचनशक्ती तर सुधारतेच पण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून कोविडासारख्या संक्रमणांना दूर ठेवण्यात मदत करते.
- डॉ. समीर गोलावार, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल नागपूर
रक्तातील साखरेची वाढ ही जेवणानंतर साधारणतः ३० मिनिटांनी सुरू होते. रात्रीच्या जेवणानंतर फिरल्यास काही प्रमाणात ग्लुकोज शरीर वापरतं. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच पूर्ण जेवण झाल्यानंतरही काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशा व्यक्तींनी रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावीच.
- डॉ. मोहन येंडे, आयुर्वेद तज्ज्ञ, नागपूर
रात्रीच्या जेवणानंतर चालणं देखील तुमच्या मानसिक आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. रात्री शांत झोप लागते. चालणे तणाव दूर करण्याचा आणि शरीरातील एंडोर्फिन रिलीज करण्यास देखील मदत करते. रात्रीच्या जेवणानंतर चालणं तुम्हाला आनंदी ठेवू शकते. नैराश्यावर मात करता येते.
- डॉ. प्रवीण नवघरे, मानसोपचार तज्ज्ञ, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com