उत्तम आरोग्यासाठी पाणी किती आणि कधी प्यावे? साध्या-सोप्या टीप्स

Sakal - 2021-03-06T163405.667.jpg
Sakal - 2021-03-06T163405.667.jpg

नाशिक : जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते. जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.  म्हणूनच या 6 कारणांसाठी जेवताना पाणी पिणे टाळा. पाणी दर दिवशी 5 ते 6 लीटर पिणे गरजेचे आहे. त्यासोबत आहारही योग्य प्रमाणात घ्यावा असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तुमच्या लघवीचा रंग तुम्ही किती पाणी पिता यावर अवलंबून असतो. प्रत्येक माणसाच्या शरीराला 2300 मिलीग्रॅम सोडियमची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्यासोबत शरीरात सोडियमची देखील तेवढीच गरज भासते. पण, जर तुमचे वयोवर्ष जास्त असेल किंवा तुम्हाला मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार असतील तर तुम्ही दिवसाला फक्त 1500 मिलीग्रॅम सोडियमचे सेवन करायला हवे.


पाणी कधी आणि किती प्यावे-
पाणी जेवणाच्या अर्धा तास आधी प्या, त्यामुळे जेवण पचनाची क्रिया सोपी होते
व्यायाम करण्याच्या 10 मिनिटे आधी पाणी प्या, एनर्जी लेवल कायम राहते.
चहा किंवा कॉफी प्यायच्या आधी पाणी प्या, अॅसिडीटीचा त्रास होणार नाही
आंघोळीच्या आधी पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास टळू शकतो
जास्त तणावाचे वातावरण असेल तर मन आणि डोक्याच्या शांतीसाठी पाणी प्या
झोपण्याच्या आधी पाणी प्यायल्याने स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी असते
संध्याकाळचा नाश्ता करण्याआधी पाण्याचे सेवन केल्याने जास्त नाश्ता करता येत नाही त्यामुळे तुम्हाला रात्री भूक लागेल
जेवण जेवताना फक्त दोन घोट पाणी प्या
सकाळी उठल्यावर 2 ग्लास पाणी प्या, त्यामुळे किडनीचा त्रास होत नाही
सकाळी व्यायाम केल्यावर 20 मिनिटांनंतर 2 ग्लास पाणी प्या, त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी कायम राहते, डिहायड्रेशन होत नाही

गॅस्ट्रिक ज्युसचा नाश होतो 
मानवी शरीररचनेनुसार, पोटातील डायजेस्टिव्ह अ‍ॅसिड पचन सुधारायला तसेच अन्नपदार्थांचे  विघटन करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या रसामुळे पोटात संसर्ग निर्माण करणारे घटक कमी होण्यास मदत होते. याला ‘ डायजेस्टिव्ह फायर’ असे देखील संबोधले जाते. खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करून शरीराला उर्जा पुरवण्याचे प्रमुख पोटातील एंजाईम्स करत असतात. पण जेव्हा हा रस पाण्यात विरघळून जातो  तेव्हा पचनक्रियेसोबतच आतड्यांमध्ये क्रॅम्स येणे, दुखणे अशा समस्या अधिक उद्भवतात. यामुळे सारी पचनक्रिया संथ होते आणि बराच वेळ अन्न पोटात साचून राहिल्याने छोट्या आतड्याचे कार्यदेखील रेंगाळते. परिणामी शरीराला अन्नातून आवश्यक पोषणद्रव्यं  मिळत  नाहीत.

लाळनिर्मिती कमी होते
पचनक्रियेची सुरवात ‘लाळे’तूनच होते. त्यातील एन्जाईम्स अन्नपदार्थांचे विघटन करण्यास मदत करतात त्याचबरोबर पोटातील डायजेस्टिव्ह एन्जाईम्सना चालना देऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत  करतात. पण जर तुम्ही जेवताना पाणी सतत प्यायल्यास लाळ  पाण्यामध्ये विरघळते. यामुळे तोंडात अन्नाचे विघटनही होण्याची प्रक्रिया कमी होते  तसेच  पचनक्रियादेखील मंदावते.

पित्त वाढते 
जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर जेवताना पाणी पिण्याची सवय हेदेखील यामागील एक कारण असू शकते. जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. परिणामी त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. पोटात काही विशिष्ट मर्यादेपर्यंतच पाणी शोषून घेतले जाते. त्यानंतर पाणी पोटातील गॅस्ट्रिक अ‍ॅसिडचेही विघटन करते. यामुळे डायजेस्टिव्ह एंन्जाईम्सदेखील कमी प्रमाणात  शोषली जातात. त्यामुळे पित्त वाढणे, छातीत जळजळ वाढणे  अशा समस्या वाढतात.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते 
जेवताना पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढू शकते.कारण जेव्हा खाल्लेल्या अन्नपदार्थांचे नीट पचन होत नाही तेव्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होऊन शरीरात काही घटक मेदाच्या स्वरूपातच शरीरात साठून राहतात. परिणामी रक्तातील साखरदेखील वाढते.

वजन वाढते 
जेवताना पाणी प्यायल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता देखील अधिक असते.  रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण तसेच अन्नपदार्थांचे पुरेसे विघटन न झाल्याने शरीरात अतिरिक्त फॅट(मेद)  साचून राहते. आयुर्वेदानुसार लठ्ठ्पणा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे दुबळी ‘डायजेस्टिव्ह फायर’.  यामुळे शरीरातील वात, कफ, पित्त यांचा समतोल ढासळतो. तसेच आरोग्यदेखील बिघडते.

 साध्या-सोप्या टीप्सने तुम्ही यावर मात करू शकता.

जेवणात मीठाचा वापर कमीत कमी करा 
मीठामुळे आपल्याला सतत तहान लागते.  त्यामुळे आहारात आवश्यक तेवढाच मीठाचा वापर करा. अळणी जेवणात वरून मीठ घालू नका.

जेवण चावून खा, गिळू नका 
‘प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा.’ असे म्हटले जाते. कारण अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मीतीला चालना मिळते व पचनही सुधारते.  तसेच अन्न चावून खाल्ल्याने त्याचे विघटन आणि पचन सुधारते. याबरोबरच अन्न चावून खाल्ल्याने लाळनिर्मिती  वाढते आणि पाणी पिण्याची इच्छा कमी होते.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com