काय आहे गोल्डन मिल्क ? जाणून घ्या त्याचे सात फायदे !

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

गोल्डन मिल्कचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या शरीरासाठी गोल्डन मिल्क कशाप्रकारे फायदेशीर आहे.

मुंबई : दुध आरोग्याला किती लाभदायक आहे हे आपण सर्व जाणताच. शरीरासाठी उपयुक्त असणारे कॅल्शिअम दुधातुन मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच दुध पियावे असा सल्ला डॉक्टर देतात. शिवाय हळदीचं दुध आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे तुम्ही वयस्कर लोकांकडून अनेकदा ऐकलचं असेल. त्यालाच 'गोल्डन मिल्क' असं म्हणतात. गोल्डन मिल्कचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या शरीरासाठी गोल्डन मिल्क कशाप्रकारे फायदेशीर आहे. गोल्डन मिल्कमध्ये हळद, आल्याची पुड, वेलची पुड हेदेखील टाकतात.

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्वचेसाठी फायदेशीर असते हळद. त्याचसोबत जखमेसाठी मलम म्हणून हळदेचा फायदा होतो. हे फार कमी लोकांना माहित आहे की, वजन कमी करण्यासाठीही हळदेचा फायदा होतो. त्यामुळे हळद आणि दुध एकत्रित घेतल्याने शरीरासाठी खुप उपयुक्त ठरतं. हे आहेत गोल्डन मिल्कचे सात फायदे.

Image may contain: drink

फोटो सोजन्य : गुगल 
1. भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स
गोल्डन मिल्कमधील महत्त्वाचा घटक म्हणजे हळद. आशियाई पाककृतीमध्ये हळद महत्त्वाची आहे. त्यामुळेच जेवणाला पिवळा रंद येतो आणि शिवाय फोडणीही हळदीशिवाय पूर्ण होत नाही. 'कर्क्युमिन' हा हळदीमधील एक घटक गेले अनेक वर्ष आयुर्वेदीक औषधांमध्येही वापरला जातो. हळदी ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. अँटीऑक्सिडंट्स या घटकामुळे जखमा लवकर बऱ्या होऊन येतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार लवकर बरा होण्यास मदत होते. अनेकजण गोल्डन मिल्कमध्ये वेलची आणि आलं देखील टारकतात. त्यामधूनही अँटीऑक्सिडंट्स मिळतात. अशाप्रकारचं हळदीचं दूध तुम्हाला शरीराला उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स पोहोचवण्याचं काम करतात. 

Image may contain: one or more people and drink

फोटो सोजन्य : गुगल 
2. जळजळ आणि सांधे दुखी कमी होण्यास मदत
 हळदीचं दुध अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. दीर्घकालिन आजाराचं दुखण हे प्रचंड वेदनादायी असतं. कर्करोग, मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजेच चयपचनाचा सिंड्रोम, अल्झाइमर म्हणजे स्मरणशक्ती कमी होण्याचा आजार, हृदयविकार आणि असे अनेक आजार शरीराला वेदना पोहोचवतात. त्यामुळे विरोधी दाहक घटक शरीरामध्ये घेणे आवश्यक असतं. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. हळदीच्या दुधाने सांधे दुखी कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीरात होणारी जळजळही कमी होते. शरीराला होणाऱ्या अनेक व्याधींपासून संरक्षण मिळते. 

Image may contain: food

फोटो सोजन्य : गुगल 
3. मेंदुला चालना आणि बुद्धी तल्लख होण्यास मदत
हळदीचं दुध मेंदुसाठीही तितकचं फाय़देशीर आहे. एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, कर्क्युमिन हा हळदीमधील घटक न्युट्रोट्राफिक घटक म्हणजेच BDNF वाढवण्याचं काम करतात. BDNF मेंदूतील सेल्सना वाढण्यास मदत करतात. त्यामुळे मेंदुला चालना मिळते तसेस बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. 

Image may contain: drink and food

फोटो सोजन्य : गुगल 
4. बिघडलेला मुड ठिक होण्यास मदत
हळदीमधील कर्क्युमिन घटक विविध पद्धतीने शरीरासाठी उपयुक्त ठरतो. तुमचा मुड ठिक करण्यास आणि डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला दूर राहण्यास मदत करतं. मेंदूतील नैराश्याला प्रवृत्त करणारे घटकांना कमी करुन मानसिक आरोग्य सुरळीत राखण्यास मदत होते. त्यामुळे हळदीचं दुध ज्याप्रमाणे शरीरासाठी फायदेशीर आहे तसचं मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. 

Image may contain: food

फोटो सोजन्य : गुगल 
5. शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित
ज्यावेळी शरीरातील साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं त्यावेळी मधूमेह सारखा त्रास होतो. गोल्डन मिल्कमधील वेलची आणि आलं हे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ज्यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हळदीचं दुध घ्यावं. जेवल्यावर शरीरात जाणारं ग्लुकोज म्हणजेच साखर वेलचीमुळे कमी होऊ शकेत. अशाप्रकारे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. 

Image may contain: drink and coffee cup

फोटो सोजन्य : गुगल 
6. पचनक्रिया सुधारते
खाण्यातील अनेक पदार्थामुळे अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. अपचनामुळे साहजिकच पोटदुखी होते. अपचनाची लक्षणे कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी गोल्डन मिल्कमधील वेलची आणि हळद हे घटक पचनासाठी मदत करतात. जेवणानंतर हळदीच्या दुधाचे सेवन करावे. झोपण्याआधी तासभर ग्लासभर गरम हळदीच्या दुध पिल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन ताण कमी करण्यास मदत करतात. 

Image may contain: drink and foodफोटो सोजन्य : गुगल 
7. वजन कमी करण्यास मदत 
वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हळदीचे दूध पिणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हळदीमुळे मेदाचे (फॅट्सचे) विघटन होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार जाडपणा घालवण्याचा महत्वाचा टप्पा असणारा भाग म्हणजे फॅट बर्न. हळद या फॅट बर्नला सुरुवात करते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is golden milk and its seven benefits