तुम्हाला कोणत्या ठिकाणी आहे, कोरोनाचा सर्वाधिक धोका? वाचा ग्राफिक्सच्या माध्यमातून

टीम ई-सकाळ
शनिवार, 4 जुलै 2020

अमेरिकेतील टेक्सास मेडिकल असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लॉकडाउनमधून बाहेर पडलेली व्यक्ती कोणत्या ठिकाणी जाते आणि कोठे त्याला कोरोनाची लागण होऊ शकते? याचा अभ्यास करण्यात आलाय.

पुणे : देशभरात लॉकडाउन टप्प्या टप्प्यानं हटवला जातोय. दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांची संख्याही हळू हळू वाढतानाच दिसत आहे. मुंबई, दिल्ली, पुणे अशा शहरांमध्ये ही संख्या आटोक्यात आणणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. पण, जवळपास दोन महिने कडक लॉकडाउन करूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढतानाच दिसत आहेत. यामागे काय कारण असावे? हा प्रश्न सामान्यांना पडलाय.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या संदर्भात अमेरिकेतील टेक्सास मेडिकल असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लॉकडाउनमधून बाहेर पडलेली व्यक्ती कोणत्या ठिकाणी जाते आणि कोठे त्याला कोरोनाची लागण होऊ शकते? याचा अभ्यास करण्यात आलाय. एक ते दहा अशा क्रमांकानुसार धोका कोठे  जास्त आहे आणि कोठे कमी आहे? याची मांडणीही करण्यात आलीय. याबाबींचा विचार करूनच तुम्ही घराबाहेर पडणे उचित ठरणार आहे. अर्थात, हा अभ्यास अमेरिकेतील असला तरी, भारतातही यातील बहुतांश ठिकाणी कोरोनाचा प्रसार झाल्याची उदाहरणे आहे. त्यामुळं हा अभ्यास आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 
No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: where we have coronavirus infection risk information marathi