तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे का? कशी ओळखाल?

immunity
immunity

नागपूर : विविध विषाणू, जिवाणू, बुरशी तसेच अन्य रोगकारक घटकांच्या हल्ल्यापासून शरीराचे रक्षण करण्यात रोगप्रतिकाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत आहे का? हे कसे समजेल? कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीची लक्षणे कोणती आहेत? कमकुवत प्रतिकारशक्तीची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला काही लक्षणे आणि कारणे सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची रोगप्रतिकार शक्ती ओळखू शकता आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय करू शकता.

रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास शरीरात आजार घर करू लागतात. शरीराची ७० टक्के रोगप्रतिकारकशक्ती पोटात सामावलेली असते. पोटातले बॅक्टेरिया रोगकारक घटकांशी लढा देऊन त्यांना रोखण्याचे काम करतात. या बॅक्टेरियांमुळे गुणकारी टी पेशींची निर्मिती होऊन रोगजंतूंना आळा बसतो. मात्र, या बॅक्टेरियांच्या कमतरतेमुळे शरीर अनेक आजारांना बळी पडते.

immunity
तर्री पोहा हे नागपूरचे वैशिष्ट्ये; खवय्यांनो एकदा चला तर

सातत्याने होणारे जुलाब, उलट्या, अपचन, गॅस अशा समस्या बॅक्टेरियांच्या कमतरतेकडे निर्देश करतात. आहार आणि जीवनशैलीत बदल करून या बॅक्टेरियांची संख्या वाढवता येईल. हे संकेत ओळखून वेळीच उपचार केल्यास तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे कसे ओळखायचे? हे जाणून घेऊ या...

जखम लवकर बरी होत नाही

सक्षम रोगप्रतिकारकशक्तीमुळे शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होतात. मात्र, जखम लवकर बरी होत नसेल तर तुम्ही सतर्क व्हायला हवे. कमकुवत रोगप्रतिकारशक्तीमुळे नव्या पेशी तयार होण्याच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्याने जखम लवकर बरी होत नाही.

थकवा जाणवत असेल तर

पुरेशी झोप आणि आराम मिळाल्यानंतरही थकवा जाणवत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे, असे समजा. योगा आणि व्यायाम करून तुम्ही रोगप्रतिकारशक्तीला चालना देऊ शकता. ताणतणाव, चिंता, काळजीमुळेही रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.

immunity
तक्रारदाराच्या मवाळ भूमिकेने आरोपीवर दया

अशी ओळखा कमजोर रोग प्रतिकारशक्ती

  • वातावरणातल्या बदलाचा शरीरावर लवकर परिणाम

  • सतत आरोग्याची समस्या भेडसावते

  • फूड पॉयझनिंग लवकर होते

  • बाहेरचे खाल्याने होतात पोटाच्या समस्या

  • डोळ्याखाली काळी वर्तूळ येणे

  • रात्री चांगली झोप घेतल्यावरही अस्वस्थ वाटणे

  • सतत थकवा जाणवणे व झोप येणे

  • अन्न पचन क्षमता कमजोर होणे

  • चिडचिडा स्वभाव

रोगप्रतिकारक शक्ती अशी वाढवा

  • वजन नियंत्रणात ठेवा

  • आपला ताण व्यवस्थापित करा

  • निरोगी आणि संतुलित आहार घ्या

  • भरपूर पाणी प्या

  • जंक फूड खाऊ नका

  • पुरेशी झोप घ्या

  • सक्रिय दिनचर्या ठेवा

  • स्वच्छता ठेवा

  • मद्यपान आणि धूम्रपान टाळा

  • अशाप्रकारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

  • आहाराकडे विशेष लक्ष द्या

  • उन्हाळ्यात दही खा

  • आहारात व्हिटॅमिन सीची फळे खा

immunity
अमरावती नाव दुर्घटना : गुरुवारी सापडले सात मृतदेह; एकाचा शोध सुरू

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com