वजन कमी करायचंय? वाचा कधी जॉगिंग करणं ठरेल फायदेशीर

प्रमोद सरवळे
Monday, 26 October 2020

आरोग्यासाठी जॉगिंग करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी होण्यासही खूप मदत होते.

पुणे: आरोग्यासाठी जॉगिंग करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी होण्यासही खूप मदत होते. ज्यांना काही कारणास्तव जिममध्ये जाता येत नाही किंवा ज्या लोकांना जड व्यायाम करता येत नाही त्यांच्यासाठी जॉगिंग हा एक उत्तम पर्याय आहे.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जेवणानंतर चालले तर त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे फॅट बर्न होण्यासही मदत होते आणि लठ्ठपणाही कमी होतो. चालण्याचे फायदे, दररोज किती चालले पाहिजे आणि चालण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे या लेखात जाणून घेऊया.

पोट सारखं बिघडतंय? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी

जॉगिंगला जाण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता-
दिवसाच्या कोणत्याही वेळी जॉगिंग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगलेच असते. पण खासकरून जेवणानंतर जॉगिंग केल्याने वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी  चांगलं असतं. ज्यांना कोणताही आजार नाही त्यांनी भविष्यात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे चालले पाहिजे.

Interval training for the best quick, effective walking workouts - The  Pacer Blog: Walking, Health and Fitness

 

चालण्यामुळे वजन कसे कमी होते?
चालण्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि पचनक्रिया अधिक चांगली असते. दररोज आपण आपल्या घरात अथवा ऑफिसच्या ठिकाणी जितके चालाल त्याचा फायदा तुम्हाला होईल.  त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण अधिकाधिक चालायला हवं.

दैनंदिन व्यायामामुळे वजन तर कमी होतेच, शिवाय रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहत असते. 2016 मधील अभ्यासानुसार, जेवणानंतर 10 मिनिटांच्या चालण्यामुळे Type 2 diabetes असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. जेवणानंतर 10 मिनिटांनी जॉगिंग करणं दिवसाच्या कोणत्याही वेळी 30 मिनिटांच्या भटकंतीपेक्षा जास्त फायदेशीर असतं.

शरीरात व्हिटॅमिन A ची कमतरता असेल तर करा या पदार्थांचा आहारात समावेश

The Best Time of Day to Walk and Exercise

चालण्यामुळे रक्तातील साखर आणि वजन कसे कमी होते?
जेव्हा तुम्ही चालता किंवा दुसरा व्यायाम करता तेव्हा तुमच्या हृदयाची गती वाढते आणि तुमचे स्नायू ऊर्जा म्हणून शरीरातील कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेचा वापर करू लागतात. जेव्हा तुम्ही अन्नातून कार्बोहायड्रेट्सचे सेवन करता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर वाढते. इन्सुलिन हे आपल्या शरीरातील साखर रक्तातून काढून शरीराच्या सर्व पेशींपर्यंत नेण्याचे काम करते. जेवणानंतर चालताना स्नायूंमधील साखरेचे प्रमाण वाढते. जेणेकरून आपल्या रक्तातून अतिरिक्त साखर काढून टाकली जाते. रक्तातील साखरेच्या नियंत्रणामुळे वजन झपाट्याने कमी होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: which time is good for jogging to lose weight is beneficial