थंडीच्या दिवसांत 7 गोष्टी ठेवतील तुमची त्वचा तजेलदार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत आहे. येत्या आठवडाभरात थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. थंडी तशी तब्येतीला चांगली. या दिवसांत भूक जास्त लागते आणि खाल्लेलं अंगालाही लागतं. पण, या थंडीच्या दिवसांत त्वचेचं नुकसान होतं. त्वचा कोरडी पडते. त्यामुळं त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांत कोल्ड क्रीम लावून, त्वचेला वरून पोषण दिलं जातं. त्याचवेळी आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर, त्वचेला वरून पोषण देण्याची गरज पडणार नाही. यासाठी आम्ही इथं काही खाद्यपदार्थांची भाज्यांची माहिती देत आहोत. ज्याचा समावेश आहारात केल्यास थंडीच्या दिवसांतही तुमच्या त्वचा तजेलदार रहील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पालक - थंडीच्या दिवसांत शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळं चेहरा पिवळा पडल्याचं दिसतं, तसेच डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळं येतात. हे टाळण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं हा उत्तम पर्याय असतो. त्यात प्रमुख्यानं पालक सर्वांत चांगला पर्याय आहे. पालक शरिरातील लोहाची कमतरता दूर करतं.

Image result for पालक"

अभिनेत्री दिप्ती धोत्रे सांगतेय; नाश्त्याचा आणि फिटनेसचा काय संबंध?

ड्रायफ्रूट्स - सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या त्वचेला तजेलदारपणा देण्यास मदत करू शकतात.  त्वचेतील नैसर्गिक मऊपणा कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमीन ईची गरज असते. त्यासाठी ड्रायफ्रूट्स तुम्हाला मदत करू शकतात. 

Image result for ड्रायफ्रूट्स"

दही - थंडीच्या दिवसांत प्रमाणात दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. थंडीत दह्यामुळं सर्दीचा धोका असल्याचं सांगितलं जातं. पण, तुम्ही सकाळी किंवा रात्री न खाता दुपारी दही खाल्लं तर ते फायदेशीर ठरू शकतं. 

Image result for दही"

टोमॅटो - टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणावर असतं. यामुळं तुमची मुरमांपासूनही सुटका होऊ शकते.

Image result for tomato"

गाजर - तजेलदार त्वचेसाठी हिवाळ्यात जास्तीत जास्त गाजरं खावीत. रोजच्या जेवणात तुम्ही गाजरांचा समावेश करा. 

Image result for गाजर"

दिया मिर्झा सांगतेय तिचा फिटनेस फंडा

मासे - थंडीच्या दिवसांत मासे खाणं खूप फायदेशीर असतं. माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी एसिड असते. त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात त्याची मदत होते. 

Image result for fish curry"

पोटाचा घेर वाढलाय या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या ठरतील

लसूण - लसूण हा एक नैसर्गिक अँटिबायोटिक आहे. लसुणामुळं रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळं त्वेचेलाही फायदेशीर असतो. लसुणामुळं मुरमांपासून सुटका होण्यासही मदत होते. त्यामुळं या दिवसांत मोठ्या प्रमाणावर आहारात लसुणाचा समावेश करावा.

Image result for लसूण -"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in winter season 7 things will keep your skin radiant