काळजी घ्या! गर्भाशयाच्या फायब्रोइड्सकडे करु नका दुर्लक्ष

जाणून घ्या, गर्भाशयाचा फायब्रोइड्स म्हणजे काय?
stomach
stomach

गर्भाशयाच्या फायब्रॉईड्सला लेयोमायोमास किंवा मायओमास म्हणून देखील ओळखले जाते. साधारणपणे वयाच्या तिशी,चाळीशीमध्ये आई होणा-या स्त्रियांना गर्भाशयाच्या फायब्रॉईड्स या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र आजकाल अगदी २१ ते ३० या वयोगटातील मुलींनादेखील गर्भाशयाच्या फायब्रॉईड्सची समस्या जाणवू लागली आहे. मात्र,बर्‍याच स्त्रिया अजूनही या समस्येकडे गंभीर्याने पाहत नाही. फायबॉइड्समुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो तसंच गर्भधारणेच्या अन्य समस्यादेखील उद्भवू शकतात. (women-health-what-is-fibroid-ssj93)

लक्षणे-

फायब्रोइड्सची लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात. परंतु सामान्य सूचीबद्ध लक्षणे म्हणजे मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव, ओटीपोटाचा वेदना, वारंवार लघवी होणे, मूत्राशयावर दबाव, मलाशयात वेदना, पाठदुखी, बद्धकोष्ठता, सूज येणे, रक्ताच्या गुठळ्या होणे. स्त्रियांना नैराश्य, चिंता, तणाव यांसारख्या समस्या देखील दिसून येतात.

गर्भाशयात फायबॉइड्स असणे का आहे चिंताजनक?

• जर गर्भाशयाच्या आतील भागाचा आकार बदलला तर एखाद्याच्या प्रजननावर फायबॉइड्स परिणामकारक ठरु शकतात. फॅलोपियन नलिका उघडण्याच्या जवळ किंवा गर्भाशयाच्या जवळ असलेल्या फायब्रोइड्स गर्भाधारणा रोखू शकतात.

- फायब्रॉएड्स गर्भाशयाचे अस्तरावर दुष्परिणाम करू शकतात आणि भ्रूण वाढ किंवा विकास थांबवू शकतात आणि गर्भपात होण्याचा धोका वाढवू शकतो.

- मोठ्या फायब्रॉईड्समुळे सिझेरियन प्रसूतीचा धोका जास्त असतो.

- फायब्रॉएड्स प्लेसेंटल बिघडवणे आणि मुदतपूर्व प्रसूति यासारख्या इतर गर्भधारणेच्या गुंतागुंतांशी संबंधित आहेत.फायब्रॉएड्सचे स्थान शोधण्यासाठी एमआरआय किंवा हायस्ट्रोस्लपोग्राफी केली जाऊ शकते.

उपचार पर्याय म्हणजे औषधे किंवा शस्त्रक्रिया. जर हे वंध्यत्वाचे कारण असेल तर फायब्रॉइड्सपासून मुक्त होण्यासाठी आपल्या डॉक्टरांना हिस्टिरोस्कोपी किंवा लेप्रोस्कोपी करावी लागेल. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधे घेऊ नका. तसंच त्रास जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे धाव घ्या.

( डॉ. सुरभी सिद्धार्थ या खारघर येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com