जागतिक कर्करोग दिन : यशस्वी नियंत्रणाचे प्रमाण आशादायक

World-Cancer Day
World-Cancer Day

पुणे - कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या ही निश्चितच काळजी वाढवणारी आहे. परंतु, रुग्ण बरे होण्याचे किंवा कर्करोगावर यशस्वी नियंत्रणाचे वाढते प्रमाण हे आशादायक चित्र आहे, असा विश्वास कर्करोगतज्ज्ञांनी व्यक्त केला. येत्या गुरुवारी (ता. ४) जागतिक कर्करोग दिन आहे. ‘मी आहे आणि मी असेन’ ही यंदाच्या कर्करोग दिनाची संकल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने शहरातील कर्करोगतज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून हा विश्वास व्यक्त केला.

का वाढले रुग्ण?
फुफ्फुसाचा आजार म्हणजे न्यूमोनिया, क्षयरोग, दमा यापुढे विचार होत नव्हता. आता कर्करोगाच्या दृष्टीने वैद्यकीय चाचण्या होतात. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दशकभरापूर्वी दरवर्षी दहा लाखांपर्यंत रुग्णांचे निदान होत. परंतु, ही संख्या आता १२ लाखांपर्यंत वाढली. याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे कर्करोगाचे अचूक निदान करण्याची वाढलेली क्षमता. त्यासाठी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे जाळे निर्माण झाले. रोगनिदानाच्या सुविधा वाढल्या, त्यांच्या केंद्राची सख्या वाढली. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाणही वाढले. यापूर्वी मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी हे निदान होत. आता नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, ठाणे अशा जिल्ह्यांमध्येही रोगनिदान केंद्र सुरू झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय जागृती
इतर कोणत्याही आजाराचे निदान झाले नाही, तर कर्करोगाच्या चाचण्यांचा सल्ला यापूर्वी दिला जायचा. परंतु, आता तज्ज्ञांमध्येही कर्करोगाबद्दल जागृती झाली आहे. त्यामुळे इतर आजारांच्या निदानाबरोबरच कर्करोगाची लक्षणे आहेत का, याचा विचार पहिल्या दिवसांपासून होतो. त्यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होते. 

नागरिकांत जागरूकता
महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात कर्करोगाबद्दल समाजामध्ये जागृती वाढत आहे. आपल्या घरात किंवा नातेवाइकांमध्ये कर्करोगाचे निदान झाल्याने याची लक्षणे, निदान, उपचार याची माहिती आता सामान्यांमध्ये वाढली आहे.

जलद निदानाचे फायदे

  • उपचारातील गुंतागुंत कमी. 
  • दहा वर्षांपूर्वी ४० ते ५० टक्के रुग्णांचे निदान चौथ्या टप्प्यावर होत. ते ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी. 
  • लवकर निदानामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी.
  • बरे होण्याचे किंवा कर्करोग नियंत्रणात आणण्याचे प्रमाण वाढले.

उपचारपद्धती

  • शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हार्मोनथेरपी, जिनथेरपी, पर्सनलाइज्ड थेरपी

कमी दाहकता; परंतु जास्त परिणामकारक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगात यापूर्वीचा संपूर्ण स्तन काढणे, हा पर्याय किमान वापरला जातो. त्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अचूकता याचा वापर वाढल्याने रुग्णसेवेची गुणवत्ता त्यातून वाढली आहे.
- डॉ. अमित भट्ट, कर्करोग तज्ज्ञ, अविनाश कॅन्सर क्लिनिक

कर्करोगाच्या उपचारांमधील समज वाढलेली आहे. कर्करोग नक्की कशामुळे होतो, कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर नेमके काय केल्याने तो नियंत्रणात आणला जातो, याची शास्त्रीय माहिती आता संशोधनातून पुढे येते आहे.
- डॉ. अनंतभूषण रानडे, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय  कर्करोगतज्ज्ञ संघटना

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com