esakal | कोरोनानंतर एक लाख व्यक्तींमध्ये १० जण करतात आत्महत्या, ही आहेत आत्महत्यापूर्व लक्षणं
sakal

बोलून बातमी शोधा

world suicide prevention day special story in kolhapur

कोरोनानंतर एक लाख व्यक्तींमध्ये १० जण करतात आत्महत्या, ही आहेत आत्महत्यापूर्व लक्षणं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील दोन वर्षात कोरोनामुळे नकारात्मकता, चिंताजनक बातम्या, यांच्यामुळे नैराश्य (डिप्रेशन) वाढलं. जवळचा माणूस सोडून गेला, आता काय करायचे जगून असे आत्महत्येचे विचार मनात येतात. त्यातच एक लाख व्यक्तीमध्ये १० जण आत्महत्या (Suicide) करतात अशी माहिती पुढे आली आहे. अशा घटनांवर मात करण्यासाठी सकारात्मक संवाद महत्त्वाचा आहे, असा सूर मानसोपचार तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आला.

हेही वाचा: धक्कादायक! मायलेकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

शुक्रवारी १० सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पर्वावर मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला. २०१९ च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतात रोज सरासरी ४०० आत्महत्या होतात. एक लाख लोकसंख्येमागे १० आत्महत्या ही गंभीर बाब आहे. ग्रामीणपेक्षा शहरात आत्महत्या अधिक होतात. वाढत्या स्पर्धेसोबत होणारे शहरीकरण देखील आत्महत्येसाठी जबाबदार ठरत आहे.

पुरुषांच्या आत्महत्या अधिक -

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. मात्र आत्महत्येचा प्रयत्न करण्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी ६० ते ८० टक्के व्यक्तींनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असतो. तीव्र नैराश्य, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधिनता, व्यक्तिगत व्यंगदेखील आत्महत्येसाठी कारणीभूत ठरू शकतात. योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि मित्रांशी संवादातून आत्महत्येसारखे विचार दूर ठेवण्यास मदत होते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे आणि डॉ. श्रीकांत निंभोरकर यांनी व्यक्त केले.

आत्महत्येची पूर्व लक्षणे

  • नेहमी उदास राहणे

  • एकलकोंडेपणा, एकटे राहणे

  • स्वतःला ओझं समजणे

  • मनाला असह्य वेदना होणे

  • नकारात्मक विचार करणे

  • छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड

  • मरणाच्या गोष्टी करणे

  • स्वतःला हानी पोहचविण्याचा प्रयत्न

मनात आत्महत्येचे विचार आले तर आप्तस्वकीयांशी निःसंकोच चर्चा करावी. मानसिकरोग तज्ज्ञांची मदत घ्यावी. औषधांमध्ये नियमितता ठेवावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं बंद करू नयेत.
-डॉ. सुशील गावंडे, अध्यक्ष, सायकॅट्रिक सोसायटी, नागपूर
आत्महत्येची पूर्वलक्षणे लक्षणे आढळून आली तर निश्चितच मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. वेळेत लक्षण ओळखून मदत मिळाली तर आत्महत्या टाळू शकते व निश्चितच जीव वाचू शकतो.
-डॉ. श्रीकांत निंभोरकर, सचिव, सायकॅट्रिक सोसायटी, नागपूर
loading image
go to top