लसीकरणानंतर पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यास मृत्यूचा धोका नाही; एम्सचा अहवाल

Corona vaccine
Corona vaccineGoogle file photo

पुणे : दिल्लीतील ऑल इंडिया मेडिकल असोसीएशन (AIIMS) ने केलेल्या स्टडीनुसार, एप्रिल-मे दरम्यान लसीकरण झालेल्या एकाही नागरिकांचा पुन्हा कोरोनाचा संसर्ग (ब्रेकथ्रू इन्फेक्शन) झाल्यानंतर मृत्यू झाला नाही. भारतात कोरोनाची दुसरी लाट पसरल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या जेनेमिक सिक्वेन्सन स्टडीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.(AIIMS study says that No deaths among those are-infected with Covid-19 even after vaccination)

''जर एकाद्या व्यक्तीचे पुर्ण लसीकरण झाल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्यास ते ब्रेकथ्रू इन्फेक्शन समजले जाते. कोरोना प्रतिंबधक लस घेतल्यानंतर पुन्हा आजारी पडल्याचा, हॉस्पिटलमध्ये दाखले केल्याचा किंवा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी अगदी कमी आहे'' अशी माहिती सेंटर फॉर डिसेज आणि कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेनशन (CDS) या अमेरीकन आरोग्य संस्थेने दिली आहे.

Corona active
Corona activeMedia Gallery
Corona vaccine
पीएमपीने बिझनेस प्लॅन: ‘बीआरटी’वर अधिक लक्ष द्या

अभ्यासातून काय समजले?

दिल्लीतील AIIMS ने एप्रिल-मे कालावधील झालेल्या ब्रेकथ्रू इन्फेक्शनबाबत पहिल्यांदाच केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, संसर्गाचे प्रमाण जास्त असूनही कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकथ्रू इन्फेक्शन झालेल्या 63 जणांपैकी 36 रुग्णांना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते तर 27 रुग्णांना एक डोस मिळाला होता.तसेच 10 रुग्णांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली होती तर 53 रुग्णांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली होती. यापैकी 36 नमुन्यांमध्ये (57.1 टक्के) SARS-CoV-2 lineages या मुळ कोरोना विषाणु आढळला. त्यातील 19(52.8 टक्के) रुग्णांची दोन्ही लसीकरण झाले होतेय आणि 17(47.2 टक्के) रुग्णांचे फक्त पहिला डोस झाला होता.

B.1.617 हा व्हेरींएट भारताता पहिल्यांदा सापडल्यानंतर त्याची B.1.617.1, B.1.617.2 आणि B.1.617.3. अशा तीन lineages मध्ये विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान, B.1.617.2 हा व्हेरीएंट प्रामख्याने 23 रुग्णांच्या नमुन्यांमध्ये आढळून आला. त्यापैकी 12 रुग्णांचे संपूर्ण लसीकरण झाले होते तर 11 रुग्णांचे अंशतः लसीकरण झाले होता. तर, B.1.617.1 हा व्हेरीएंटचे 4 नमुने आढळले तर B.1.617.3. व्हेरीएंटचा एक नमुना आढळला आहे.

दरम्यान, 5-7 दिवस सर्व रुग्णांना निरंतर ताप होता पण ब्रेकथ्रू इन्फेक्शनबाबत अभ्यास करताना त्यांना कोणलाही धोका नव्हता. सरासरी 37 (21-92) वयोगटातील रुग्ण असून त्यापैकी 41 पुरूष होते तर 22 महिलांता समावेश होता. यापैकी कोणत्याही रुग्णांना कोणतीही सहव्याधी(comorbidities) नव्हते की जे ब्रेकथ्रू इन्फेक्शनसाठी संभाव्य घटक म्हणून कार्य करू शकतात.

या गृपमध्ये B.1.617.2 हा व्हेरीएंट तीव्र असल्याने संपूर्ण आणि अंशतः लसीकरण केलेल्या नमुन्यांमधील विषाणूच्या वंशातील कोणत्याही महत्त्वपूर्ण फरकांचे विश्लेषण केले गेले.

याव्यतिरिक्त, लसीच्या प्रकारानुसार या विषाणूच्या वंशाच्या प्रसारामधील फरक देखील तपासले गेले. यामध्ये लक्षणीय असा फरक जाणवला नाही. ब्रेकथ्रू इन्फेक्शनमध्ये 10 रुग्णांमध्ये (8 जणांनी दोन्ही लस घेतली तर दोघांनी एकच डोस घेतला होता ) केमिलोमिनेसेंट इम्युनोसेद्वारा मूल्यांकन केलेले एकूण इम्युनोग्लोबुलिन जी (आयजीजी) अँटीबॉडीज आढळल्या.

यापैकी 10 रुग्णांपैकी 6 रुग्णांमध्ये संसर्ग होण्याच्या महिनाभर आधीच तर 4 रुग्नांना आजार बरा झाल्यानंतर IgG अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या.

Corona
CoronaEsakal
Corona vaccine
लहान मुलांमध्ये आढळतोय MIS-C आजार; पुण्यात आढळले रुग्ण

संसर्ग किंवा लस आयूष्यभर पुरेल अशी रोगप्रतिकार शक्ती देऊ शकते का?

अलीकडे झालेल्या 2 अभ्यासनुसार, SARS-CoV-2 संक्रमित झालेल्या किंवा कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लोकांना या आजारावर आजीवन प्रतिकारशक्ती असू शकते.

तथापि, हे पुन्हा संक्रमणापासून संरक्षणाची हमी देत नाही परंतु शरीरात कोरोना विषानुला जास्त काळ लढा देणार्‍या अॅन्टीबॉडीज विकसित होऊ शकतात अशी आशा देतात.

पुन्हा संसर्गाच्या घटनांमुळे शास्त्रज्ञ आणि जनता चिंताग्रस्त आहे आणि विषाणूविरुध्द प्रतिकारशक्ती कमी काळासाठी आहे का याचा विचार करत असल्यामुळे हा अभ्यास नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत कोरोना विरूद्ध सातत्याने प्रतिकारशक्ती सुनिश्चित करण्यासाठी वारंवार लसीकरण ( वार्षिक किंवा सहा-मासिक लसीकरण) आवश्यकता असू शकते अशी भीती वर्तविली जात आहे.

या अभ्यासामध्ये शास्त्रज्ञांना असे आढळले की, कोरोना विरूद्ध प्रतिकारशक्ती किमान एक वर्ष तरी टिकली. तसेच कमीतकमी काही लोकांमध्ये कोरोना विरुद्ध प्रतिकारशक्ती दशके टिकू शकते असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com