Boiled Water : उकळलेले पाणी पिणाऱ्यांनो सावधान; छोटीशी चूक ठरू शकते घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boiled Water

Boiled Water : उकळलेले पाणी पिणाऱ्यांनो सावधान; छोटीशी चूक ठरू शकते घातक

Boiled Water : कोरोना काळात अनेकांनी गरम पाणी पिण्यावर भर दिला होता. त्यात आता पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: जाणून घ्या, जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे; समस्या होतील दूर

त्यामुळे पुन्हा एकदा नागरिक गरम पाणी प्यायला सुरूवात करतील. मात्र, उकळलेले किंवा गरम पाणी तुम्हीदेखील पित असाल तर, तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

कारण, तुमची छोटीशी चूक तुम्हाला हृदयविकारापासून ते कर्करोगाला बळी पाडू शकते. त्यामुळे जर तुम्ही पाणी उकळून पीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

हेही वाचा: Copper Bottle : तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे फायद्याचे; मात्र या रूग्णांनी जपून राहा नाहीतर...

  • पाणी उकळण्याच्या चुकीमुळे पाण्यात आर्सेनिक, नायट्रेट आणि फ्लोराईडचे प्रमाण खूप वाढते आणि त्यामुळे अनेक घातक पदार्थ पाण्यात शिरतात.

  • तज्ज्ञांच्या मते, नळाचे पाणी पुन्हा उकळल्याने कर्करोग, हृदयाच्या समस्या, किडनीच्या समस्या तसेच मानसिक विकारांसारखे अनेक आजार होऊ शकतात.

  • पाणी उकळल्याने त्यातील रसायने बदलतात आणि त्यामुळे तेच पाणी पुन्हा पुन्हा उकळल्याने त्यात विरघळलेल्या क्षारांची संख्या वाढते.

  • पाण्यातील अनेक क्षार आणि रसायने शरीरासाठी फायदेशीर असतात. मात्र, अनेकदा पाणी उकळल्याने पाण्यात हानिकारक रसायने निर्माण होतात. ज्यामुळे कॅन्सर, नॉन-हॉजकिन लिम्फोमा यांसारखे अनेक गंभीर आणि घातक आजार होऊ शकतात.

हेही वाचा: Health : मिठाचे पाणी रोज पिल्याने आरोग्याला दुहेरी फायदे होतात; कसे जाणून घ्या

  • पाणी वारंवार गरम केल्याने पाण्यातील चांगली रसायने निघून जातात आणि हानिकारक रसायनांची निर्मिती होते. पाणी जास्त उकळल्याने त्यातील नायट्रेटचे प्रमाण वाढते. पाण्यातील नायट्रेट्सचे नायट्रोसमाइनमध्ये रूपांतरित झाल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: Weight Loss: खरंच गरम पाणी पिल्याने वजन कमी होतंय? वाचा सविस्तर

  • याशिवाय पाणी जास्त उकळल्याने आर्सेनिकचे प्रमाण वाढते. अधिक आर्सेनिकयुक्त पाणी प्यायल्याने कर्करोग, हृदयविकाराचा झटका आणि अनेक प्रकारच्या मानसिक आजारांचा धोका वाढतो. वर्षानुवर्षे आर्सेनिकयुक्त दूषित पाणी पिणाऱ्या व्यक्ती त्वचेशी संबंधित अनेक आजारांना बळी पडतात.

डिस्क्लेमर : वरील लेख केवळ सामान्य माहितीच्या आधारावर आहे. अधिक माहिसाठी तुम्ही तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.