झोपण्याची योग्य स्थिती

उदास किंवा चिंतेत असतात ते नेहमी पोटावर तर आजारी आणि लठ्ठ पाठीवर झोपतात
Correct sleeping position by hansa yogendra
Correct sleeping position by hansa yogendraSakal
Updated on

- डॉ. हंसा योगेंद्र

तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्‍भवू शकतात. उदास किंवा चिंतेत असतात ते नेहमी पोटावर तर आजारी आणि लठ्ठ पाठीवर झोपतात.

नोकरदार आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करतात, ते डाव्या कुशीवर झोपतात. योगी आणि ध्यानावस्थेत असलेले लोक कमी अन्न खातात म्हणून उजव्या कुशीवर झोपतात. यापैकी कोणती झोपण्याची उत्तम स्थिती आहे ते समजून घेऊ या.

ओटीपोटावर झोपणे ही तुमची झोपेची शेवटची निवड असावी. तुमचा पाठीचा कणा या स्थितीत त्याच्या नैसर्गिक संरेखनात कधीच नसतो. ओटीपोटावर झोपल्याने पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास होऊ शकतो.

पोटावर झोपता तेव्हा छाती दबली जात असल्याने फुप्फुसांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. परिणामी झोपल्यानंतरही थकवा येऊ शकतो. या स्थितीत तुमच्या पचन क्रियेवरही परिणाम होऊ शकतो.

पाठीवर झोपण्याचे फायदे आणि तोटे आहेत. गर्भवती महिला, वजनदार प्रौढ आणि वृद्ध लोकांनी पाठीवर झोपणे टाळावे. त्यामुळे कधीकधी पाठदुखी वाढू शकते. ॲसिड रिफ्लक्स आणि पोट फुगण्याची समस्या असलेल्या लोकांनी या स्थितीत झोपणे टाळावे.

एका कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती आहे. ती शरीराला झोपेत खूप मदत करते. डाव्या आणि उजव्या कुशीवर झोपण्याचे फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, डाव्या कुशीवर झोपणे ही सर्वोत्तम स्थिती आहे.

कारण ती पचनास मदत करते. ही स्थिती घोरणे टाळू आणि थांबवू शकते. उजवी नाकपुडी बंद आहे असे वाटत असलेल्यांनी या स्थितीत झोपल्याने तुमची नाकपुडी उघडू शकते. गर्भवती महिलांसाठी ही सर्वोत्तम स्थिती आहे. या स्थितीमुळे वाढत्या पोटाचा दाब कमी होतो.

मणक्याचे वाकणे कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात समस्या असलेल्या लोकांसाठी ही स्थिती चांगली आहे. मांड्या किंवा गुडघ्यांमध्ये उशी ठेवल्यास झोपेच्या वेळी पाठदुखीपासून खूप आराम मिळतो. पाठीच्या समस्या असलेल्या लोकांसाठी गर्भासारखी असलेली स्थिती सर्वोत्तम आहे.

डाव्या कुशीवर झोपल्याने तुमची उजवी नाकपुडी (सूर्यनाडी) उघडते त्यामुळे ऊर्जा आणि पचनशक्ती वाढते. वातानुकूलित खोलीत झोपता, तेव्हा डाव्या कुशीवर झोपणे योग्य असते कारण ते तुमच्या शरीराचे तापमान संतुलित करेल.

उजव्या कुशीवर झोपणे ही देखील चांगली स्थिती आहे. आपल्याला डाव्या कुशी इतकेच या कुशीवर झोपल्याचे समान फायदे आहेत. पोट रिकामे असताना, योग्य स्थितीत झोपल्याने तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो.

ते तुमच्या डाव्या नाकपुडीतील अडथळे कमी करण्यास मदत करते. तुम्ही उजवीकडे झोपता तेव्हा डावी नाकपुडी (चंद्रनाडी) उघडते. त्यामुळे या स्थितीमुळे तुमचे शरीर थंड होण्यास मदत होते. झोप तुमच्या आयुष्याचा एक तृतीयांश भाग आहे.

त्यामुळे तुमच्या जीवनाचा या भागाचे निरोगी पद्धतीने व्यवस्थापन करा. एकंदर आरोग्यामध्ये झोप महत्त्वाची भूमिका बजावते. झोपण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे विविध प्रकारचे आरोग्य विकार होऊ शकतात. म्हणून, झोपण्याच्या सर्व पद्धतींपैकी, विशेषतः डाव्या कुशीवर झोपणे जास्त श्रेयस्कर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com