
Mental Health : तुमच्या जवळच्यांपैकी कोणाचा स्वभाव स्वतःचं खरं करण्याचा आहे का? सावधान...
Mental Health : प्रत्येकाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचे असते, पण भावनिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी तुमचे मानसिकदृष्ट्या मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. हे खरं आहे की भावनिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण तज्ञांच्या मते या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत.
आयुष्यात प्रत्येकजण भावनिक असतो, पण प्रत्येकाला आपला स्वभाव कठोर आणि आदर्शवादी असावा असं वाटत असतं, अर्थात हे शक्य नाही, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण काही उगाच आपण वापरत नाही, पण त्यातही असे काही लोकं असतात ज्यांचा स्वभाव आपल्याला पटत नाही.. त्यांचे काही गुण आपल्याला नकोसे होतात. असे गुण कोणते?
१. ओव्हररिअॅक्ट करणे :
एखाद्या परिस्थितीत ओव्हररिअॅक्ट करणं ठीक आहे पण प्रत्येकाच बाबतीत उगाच ओव्हररिअॅक्ट करणं काही बरोबर नाही. एखादा मुद्दा धरुन त्यावर सततची चर्चा आणि उगाच करुन गैरसमज करणं चुकीच आहे. त्यापेक्षा समोरच्या माणसाचा मुद्दा नीट ऐकला तर अनेकदा वाद मिटतात.
२. समस्यांपासून दूर पळणे :
तज्ज्ञांच्या मते जी लोक भावनिकदृष्ट्या मजबूत असतात ते कधीही त्यांच्या समस्यांपासून दूर पळत नाहीत. त्यांच्या चुका सुद्धा ते मान्य करतात आणि त्यावर काम करतात. जे लोक भावनिकदृष्ट्या मजबूत नसतात, त्यांच्यामध्ये कोणती चूक आहे हेच ते मान्य करत नाही.
३. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरणे :
कोणत्याही गोष्टी साठी स्वतःला जबाबदार ठेवणं अतिविचार करणं कधीही वाईट. याने आपल्याला तर त्रास होतोच पण समोरचा व्यक्तीही दुखावतो. ओव्हरथिंकिंग करण्यापेक्षा जरा स्वतःवर प्रेम करा आणि आपण कसे वाईट आहोत किंवा प्रत्येकात आपली निगेटिव्ह बाजू शोधणं बंद करा.
४. नेहमी स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न :
जे लोक भावनिकदृष्ट्या खंबीर असतात ते कधीच स्वत:ला योग्य सिद्ध करण्यासाठी धावत नाहीत. तज्ज्ञांचे मते अशी लोकं चूक करूनही स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्या चुका मान्य करत नाही.