शरीरशास्त्र : टेक्स्ट नेक सिन्ड्रोम

आजच्या टेक्नोसॅव्ही जगामध्ये सगळ्यांच्या हातात सतत असणारी वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि त्यातलाच सगळ्यात आवडता म्हणजे मोबाईल फोन. तुमच्या आवडत्या मोबाईल फोनमुळे होणारी मानेची वेदना म्हणजेच ‘टेक्स्ट नेक सिन्ड्रोम.’
text neck syndrome
text neck syndromesakal
Summary

आजच्या टेक्नोसॅव्ही जगामध्ये सगळ्यांच्या हातात सतत असणारी वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि त्यातलाच सगळ्यात आवडता म्हणजे मोबाईल फोन. तुमच्या आवडत्या मोबाईल फोनमुळे होणारी मानेची वेदना म्हणजेच ‘टेक्स्ट नेक सिन्ड्रोम.’

- डॉ. अजय कोठारी, डॉ. सोना कोलके

आजच्या टेक्नोसॅव्ही जगामध्ये सगळ्यांच्या हातात सतत असणारी वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि त्यातलाच सगळ्यात आवडता म्हणजे मोबाईल फोन. तुमच्या आवडत्या मोबाईल फोनमुळे होणारी मानेची वेदना म्हणजेच ‘टेक्स्ट नेक सिन्ड्रोम.’ ‘टेक्स्ट नेक’ ही परिभाषा मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे होणारी मानेची वेदना दर्शवते. संशोधनामध्ये असे निदर्शनास आले, की दिवसातील जवळपास ३ ते ४ तास मोबाईल फोन वापरला जातो. हे वेड आबालवृद्धांना असल्यामुळे अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत कोणालाही हा आजार होण्याची शक्यता आहे.

टेक्स्ट नेक सिन्ड्रोम आणि लक्षणे

सतत मान वाकवून एकाच स्थितीमध्ये तासनतास मोबाईल फोन वापरल्यामुळे मानेच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो, त्यांना थकवा जाणवून वेदना होऊ लागतात. एकाच स्थितीमध्ये मान असल्यामुळे मानेच्या कण्यावर असलेला डोक्याचा भार वाढतो

लक्षणे

  • मानेमध्ये वेदना

  • खांदेदुखी

  • मानेच्या स्नायूंमध्ये ताठरपणा

  • डोकेदुखी, डोळेदुखी

  • मानेची हालचाल करताना स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे.

  • या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास,

  • मानेचे दुखणे हातात जाणे

  • हाताला मुंग्या येणे

  • कालांतराने हाताच्या स्नायूंची ताकद कमी होते.

  • ही लक्षणे जाणविल्यास ‘ऑर्थोपेडिक डॉक्टर’ आणि ‘फिजिओथेरपिस्ट’चा सल्ला घेणे आवश्यक आहे हे होऊ नये यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणे गरजेचे आहे.

‘टेक्स्ट नेक सिन्ड्रोम’ टाळण्यासाठी...

  • मोबाईलचा वापर कमी करणे

  • मोबाईल वापरताना मानेवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी घेणे.

  • दर २० मिनिटांच्या मोबाईलच्या वापरानंतर विश्रांती आणि मानेची हालचाल तसेच मानेच्या स्नायूंची लवचिकता वाढवणारे व्यायाम करणे.

  • मोबाईल डोळ्यांच्या पातळीवर ठेवणे.

  • मोबाईल फोन स्टॅन्डचा वापर करणे.

  • जास्त वेळ मोबाईल वापरायचा असल्यास टीव्ही किंवा लॅपटॉपला जोडावा.

  • शक्यतो झोपून मानेच्या खाली मोठी उशी ठेवून सेल फोनचा वापर टाळावा.

  • स्क्रीन टाइम कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करणे.

  • मान दुखत असताना मान मोडू नये.

  • मान जास्तीत जास्त खाली वाकेल अशी कामे टाळावीत.

  • मोबाईल वापरताना डोके शरीरापेक्षा जास्त पुढे असल्यास शरीराची स्थिती बदलणे आणि मान पाठीमागे घेणे.

  • झोपताना मानेचा वक्राला आधार मिळेल अशीच उशी वापरावी

हे नक्की करा...

  • गरम पाण्याच्या पिशवीने शेक देणे.

  • ‘चीन टक’ हनुवटी मागे करण्याचा व्यायाम

  • मानेच्या हालचालीसाठी, लवचिकतेसाठी आणि स्नायूंच्या ताकदीसाठी व्यायाम करणे.

‘फिजिओथेरपिस्ट’ची मदत

  • मानेच्या वेदनेचे परिमाण जाणून घेणे.

  • तुमच्या शरीराची ठेवण जाणून घेणे आणि तुमचे स्नायू, सांधे यांच्या ताठरपणा आणि ताणाच्या समस्येचे मूल्यांकन करणे.

  • फिजिओथेरपिस्ट वेदना, शरीराची ठेवण, मानेच्या हालचाली याबद्दल माहिती देईल आणि त्याबद्दल जागरूकता वाढवून तुमच्या समस्या कमी करण्यास मदत करेल. तुम्हाला व्यायामाचा एक संच तुम्हाला ठरवून दिला जाईल, जो समस्या कमी करायला मदत करेल इतकेच नव्हे तर तुमच्या मानेला अधिक सुदृढ बनवायला मदत करेल.

डॉक्टर कशी मदत करू शकतात?

  • तीव्र वेदना, प्रगत लक्षणे आहेत, ज्यांना औषधे आणि फिजिओथेरपी करूनही आराम मिळत नाही त्यांना पेन ब्लॉक (इंजेक्शन) थेरपीची आवश्यक्यता भासू शकते. ज्याद्वारे नसांवरील सूज कमी होईल.

  • नंतरच्या टप्यात स्नायूंमधील ताकद कमी झाल्यास, लघवी आणि मल विसरीत करण्यास त्रास होऊ लागल्यास की-होल स्पाईन सर्जरीची आवश्यकता भासू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com