
Bone Fragility : हाडांची ठिसूळता
- डॉ. अजय कोठारी
Bone Fragility : आपल्या इमारतीच्या बांधकामासाठी सिमेंट कमी प्रतीचे वापरले असल्यास ती लवकरच ढासाळेल. त्याचप्रमाणे आपल्या हाडामध्ये कॅल्शिअमची कमतरता असल्यास त्यामध्ये वारंवार फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढेल. हाडांची ठिसूळता महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तीन पटीने जास्त असते.
कारणे
आहार
प्रथिनांची कमतरता असलेला आहार
पॅकड् फूड, फास्ट फूडचा अतिवापर
कॅल्शिअमची कमतरता असलेला आहार.
दारू, सिगारेट, तंबाखू यांचे प्रमाणाबाहेर व्यसन
बैठी जीवनशैली
मैदानी खेळ न खेळणे
लठ्ठपणा
महिलांमध्ये मासिक पाळी बंद होते किंवा ज्या महिलांची गर्भाशयाची पिशवी काढली जाते, त्या महिलांमध्ये इस्ट्रोजेल, प्रगास्ट्रिरोरिन हार्मोन कमी होत असल्याने हाडांमध्ये ठिसूळता वाढते.
कॅल्शिअम व ‘व्हिटॅमिन डी-३’ची कमतरता
स्टेरॉईडचा अतिरिक्त वापर
आनुवंशिकता
लक्षणे
थकवा
कमजोरी
हाड आणि सांध्यांमध्ये वेदना
वारंवार फ्रॅक्चर होणे
कुबड निर्माण होणे
निदान कसे करायचे
डेक्सा स्कॅन ही सर्वांत अचूक निदान करणारी टेस्ट आहे. त्यामध्ये ‘टी’ स्कोअर २.५ पेक्षा कमी असल्यास त्याच्या हाडांमध्ये ठिसूळता आहे असे समजते.
रक्त ः ‘कॅल्शिअम, ‘व्हिटॅमिन डी-३’, अल्कलाईन फॉस्फेट तपासणी क्ष-किरण
उपचार
लवकरात लवकर केलेल्या निदानामुळे औषधोपचार करणे शक्य होते.
कॅलशिअमयुक्त आहार व औषध
‘व्हिटॅमिन डी-३’ साठी सकाळचे उन्ह १ तास घेणे.
बिशफॉस्फोनेट गोळ्या महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेणे.
कसे टाळावे?
नियमित व्यायाम, योगा प्राणायाम, चालणे, जॉगिंग, सायकलिंग, मैदानी खेळ खेळणे.
पौष्टिक आहार ः दूध, सुकामेवा, नाचणी सत्त्व याचा आहारात समावेश करणे
हिरव्या भाज्या ः पालक, मेथी, फळे केळी, डाळिंब, अंजीर, सीताफळ याचाही आहारात समावेश करणे.
ताणतणाव, व्यसनापासून दूर राहणे