
आपल्या शरीरातील पचनशक्ती ऊर्जेचे स्थान आहे. या यंत्रणेमार्फत अन्नावर प्रक्रिया केली जाते आणि ऊर्जा निर्माण केली जाते. त्यामुळेच शरीरातील या ऊर्जा केंद्राची काळजी घेणे आवश्यक आहे.
मनाची शक्ती : पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी...
- डॉ. हंसा योगेंद्र
आपल्या शरीरातील पचनशक्ती ऊर्जेचे स्थान आहे. या यंत्रणेमार्फत अन्नावर प्रक्रिया केली जाते आणि ऊर्जा निर्माण केली जाते. त्यामुळेच शरीरातील या ऊर्जा केंद्राची काळजी घेणे आवश्यक आहे. मुळातच घरी शिजवलेले अन्न सर्वोत्तम प्रकारचे असते. पचनक्षमता चांगली असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील सर्व पेशी आनंदी असतात.
पचनसंस्थेत बिघाड निर्माण झाल्यास बद्धकोष्ठता, जुलाब, पोट फुगणे आदी समस्या निर्माण होतात. याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. शरीर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ एकाच जागी बसून राहणे हा पचनक्रियेच्या समस्यांपैकी एक आहे. तुम्ही जास्त वेळ बसल्यास तुमची आतड्यांची पुरेशी हालचाल होत नाही. परिणामी पचनयंत्रणेवर परिणाम होतो. यावर एक सोपा उपाय आहे, दर अर्ध्या तासाने उठून काही मिनिटे चाला.
निरोगी पचनासाठी काही टिप्स -
सकाळी सर्वांत आधी दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे पोटातील कचरा दूर होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास कोमट पाणी प्या.
ठराविक वेळेत खा. त्याचबरोबर भूक लागल्यावरच खा.
तणावग्रस्त जेवण किंवा काही खाऊ नका. घाईघाईत जेवू नका.
जेवण्यापूर्वी अर्धा तास आधी काही घोट पाणी प्या. हे पचनास मदत करते.
तुम्ही घरी असाल तर जेवण्यापूर्वी अर्धा तास पोटावर काही मिनिटे झोपा. हे वायू सोडण्यास आणि आपल्या पोटातील अतिरिक्त ॲसिड कमी करण्यास मदत करते. तुम्ही कामावर असाल, तर काही पावले चाला किंवा पायऱ्यांवरून चढ-उतार करा.
चार तासांनंतर भूक लागेल एवढेच खा.
जेवणानंतर शतपावली जरूर करा.
तसेच, रात्री झोपण्यापूर्वी यस्तिकासन आणि सुप्त भद्रासन यासारखी आसने करा. ही आसने पचन प्रक्रियेस मदत करू शकतात. भस्त्रिका प्राणायाम सकाळी केल्यास पचनास मदत होते.
बिघडलेल्या पोटावर तोडगा काढण्यासाठी सर्वांत उत्तम अन्न म्हणजे दही आणि भात. भातात दही मिसळा, ते खाण्यापूर्वी थोडे तूप आणि जिरे मिसळा. हे अन्ननलिकेच्या संपूर्ण अस्तरांना मदत करते. आठवड्यातील एका दिवशी फक्त फळे खाल्ल्याने पोट मजबूत होते आणि शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते.