वसा आरोग्याचा : मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? ती विषाणूंविरूद्ध लढण्याची क्षमता आहे. ते बॅक्टेरिया, बुरशी, पॅरासाइट किंवा इतर कोणत्याही हानिकारक पदार्थ असू शकतात.

वसा आरोग्याचा : मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती

- डॉ. कोमल बोरसे

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? ती विषाणूंविरूद्ध लढण्याची क्षमता आहे. ते बॅक्टेरिया, बुरशी, पॅरासाइट किंवा इतर कोणत्याही हानिकारक पदार्थ असू शकतात. बाळाची रोग प्रतिकारशक्ती मजबूत असल्यास ती केवळ सर्दी आणि खोकल्यापासून आपले संरक्षण करत नाही तर, हेपाटाइटिस, लंग इन्फेक्शन, किडनी इन्फेक्शनसह अनेक आजारांपासून संरक्षण करते. आपल्या आजूबाजूला बरेच रोगकारक घटक आहेत. आपल्याला कळत सुद्धा नाही आणि ते हानिकारक घटक आपल्या अन्न, पिण्याच्या पाण्यासह आणि श्वासोच्छवासासह शरीरात जातात.

परंतु यानंतरही, प्रत्येक बाळ आजारी पडत नाही. कारण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते. त्यांना या बाह्य संसर्गाचा विरोध त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती करते. आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे, हे रक्ताच्या तपासणीवरून समजते. तसेच आपले शरीर आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देखील देण्यास सुरूवात करते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे, हे आपल्याला सहज समजते. दिवसेंदिवस लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत चालली आहे. वीस-तीस वर्षांपूर्वी प्रतिकारशक्ती खूप चांगली असायची.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची कारणे...

  • शहरातील मुले वर्षातून किमान शंभर दिवस तरी बाहेरचे अन्न जसे की पिझ्झा, बर्गर, चिप्स, बेकरी पदार्थ खातात. या पदार्थांमध्ये कुठलीही पोषकतत्त्व आढळून येत नाही.

  • प्रदूषणामुळे देखील मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. श्वसनाचे विकार जसे की दमा, अस्थमा वाढते. जगातील २० पैकी १३ प्रदूषित शहरे ही भारतातली आहे.

  • मुलांचा अभ्यासातील ताणतणाव देखील वाढत चालला आहे मुले अभ्यासाचा ताण घेऊन परीक्षेलाच आजारी पडतात.

  • अन्नपदार्थांमधील भेसळ हेही रोगप्रतिकारशक्ती कमी असण्याचे कारण आहे. ते आपण बदलू नाही शकत परंतु टाळू शकतो.

रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास...

  • अभ्यासावर परिणाम होतो

  • उंची वाढत नाही

  • खाल्लेले अन्न अंगी लागत नाही, म्हणजे खाल्लेल्या आहारातील पोषण तत्त्वाचे शरीरामध्ये शोषण होत नाही.

म्हणजेच बाळाच्या सगळ्याच गोष्टींवर प्रतिकारक शक्तीमुळे होत असतो.

तुमच्या मुलांना पोषक आहार नकोसा वाटतो, यासाठी काही उपाय...

1) मुलांना फळे व भाज्या खरेदी करताना सोबत घेऊन जा. जेणेकरून ते स्वतः त्यांच्या आवडीचे विविध रंगाचे भाज्या व फळे निवडतील. आणि आवडीने खातील देखील. त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती होणार नाही.

2) मुलांना अशा स्वयंपाकाच्या पद्धती शिकवा त्याच्यामध्ये गॅस वापरला जाणार आहे. जसे की सँडविच, ज्यूस, सलाड बनवणे.

3) घरात जमेल तशी जागा करून कुंड्यांमध्ये वेगवेगळ्या भाज्या जसे टोमॅटो, भेंडी पालक, मेथी, कोथिंबीर, कलम केलेले फळांचे झाडे लावा म्हणजे ‘बी’पासून पासून फळापर्यंतची झाडाची वाढ ते बघतील आणि त्यांची फळे व भाज्या खाण्याची आवड निर्माण होईल.

मुलांना साखर किती प्रमाणात देऊ शकतो?

सहा महिन्यानंतर बाळाला जेव्हा अन्नप्राशन करतो त्यावेळेस पासून त्यांना साखर आणि मीठ या पांढऱ्या विषापासून दूर ठेवावे. कारण बाळाची किडनी जन्माच्या वेळी पूर्ण परिपक्व नसते. त्यामुळे हे पदार्थ त्यांना देऊ नये तीन-चार वर्षाच्या बाळासाठी दिवसाला पंधरा ग्रॅम साखर व पाच ग्रॅम मीठ देऊ शकतो परंतु गोड पदार्थ चॉकलेट, चिप्स, यासारखे पदार्थ देऊ नये. गोड पदार्थांमुळे दाताला कीड लागते व दात लवकर खराब होतात. कोणताही पॅकेट घेताना त्यातील असणारे पोषणतत्त्वाचे लेबल बघावे.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :childrenhealth