आरोग्यमंत्र : निरोगी हास्यासाठी...

तुम्हाला तुमच्या तोंडाचा प्रकार माहिती आहे का? काय तुम्ही योग्य दंत उत्पादने वापरत आहात? सुपरमार्केटमधील खरेदी बऱ्याचदा जाहिरातींच्या प्रभावावर अवलंबून असते.
Tooth Paste
Tooth PasteSakal

- डॉ. विधी कबाडे

तुम्हाला तुमच्या तोंडाचा प्रकार माहिती आहे का? काय तुम्ही योग्य दंत उत्पादने वापरत आहात? सुपरमार्केटमधील खरेदी बऱ्याचदा जाहिरातींच्या प्रभावावर अवलंबून असते. आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री एखाद्या उत्पादनाचे प्रमोशन करत असेल तर ते उत्पादने खरेदी करण्यापूर्वी आपण फारसा विचार करत नाही. आज, मी दंत उत्पादनांबद्दल सांगणार आहे. तुमचा टूथब्रश, टूथपेस्ट किंवा माऊथवॉश तुमच्यासाठी खरोखर योग्य आहे का?

शॅम्पू, कंडिशनर, टूथपेस्ट किंवा माउथवॉश कोणतेही उत्पादन निवडण्यापूर्वी, प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचा, त्वचेचा किंवा तोंडाचा प्रकार समजून घेणे. अनेक वर्षांच्या जाहिरातींमधून आणि त्वचारोग तज्ज्ञांकडून मिळालेल्या शिक्षणामुळे, लोक आता त्यांच्या त्वचेचा प्रकार समजून घेत आहेत. आणि त्यानुसार केस आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने निवडत आहेत. परंतु, मौखिक प्रकार आणि या उत्पादनांचे प्रकार समजण्यापासून आपण अजूनही खूप दूर आहोत.

मूलभूतपणे, मौखिक आरोग्याचे प्रकार खालीलप्रमाणे विभागले आहेत आणि त्यानुसार वैयक्तिक काळजी घेणे आवश्यक आहे.

1) कीडप्रवण तोंड - रोज दंत आरोग्य दिनचर्येचे पालन करूनही दात किडण्याची उच्च संभाव्यता.

समस्या - दातांवरील इनॅमलची गुणवत्ता समान नसणे, लाळेची रचना विस्कळित असणे, आहारातील समस्या, इतर वैद्यकीय परिस्थिती जसे की ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता, जीईआरडी इ.

दंत उत्पादने - किमान ९००ppm फ्लोराईड (प्रौढांसाठी) असणारी टूथपेस्ट आणि २००ppm फ्लोराइड असणारा माऊथवॉश निवडा.

2) संवेदनशील तोंड - थंड किंवा गरम अन्नपदार्थ खाल्ल्यावर अचानक तीक्ष्ण संवेदनशीलता जाणवते.

समस्या - एकापेक्षा जास्त दातांमध्ये इनॅमलचा पातळ थर असतो, मुळांची रचना उघडी असते, आक्रमक घासणे आणि दात घासणे यामुळेही होऊ शकतो.

दंत उत्पादने - अल्ट्रासॉफ्ट टूथब्रश, कॅल्शिअम सोडियम फॉस्फोसिलिकेट असलेली टूथपेस्ट, पोटॅशियम नायट्रेट असलेले माउथवॉश.

3) कोरडे तोंड - जीभ, ओठ आणि मुळात संपूर्ण तोंडावर अगदी सामान्य परिस्थितीतही कोरडेपणा असणे.

समस्या - वृद्धत्व, तंबाखूचे सेवन, अल्कोहोल सेवन, कर्करोगावरील उपचार आणि काही औषधांमुळे कोरडे तोंड आणि श्वासाची दुर्गंधी येणे.

दंत उत्पादने - ग्लिसरीन असलेले अल्कोहोल फ्री माउथवॉश, नियमित ऑइल पुलिंग, झ्लायिटोल (Xlyitol) असलेली ‘एसएलएस’मुक्त टूथपेस्ट.

4) असंरेखित दात असलेले तोंड - दात संरेखित नसतात, तिरके, पुढेमागे किंवा अंतरावर असणे.

समस्या - दात-जबड्याच्या आकारात विसंगती, दुधाच्या दातांचे उशिरा पडणे आणि कायमचे दात वेडेवाकडे येणे.

दंत उत्पादने - सोडियम फ्लोराइड असलेले माउथवॉश, ऑर्थोडोंटिक आणि इंटरडेंटल टूथब्रश, पोटॅशियम नायट्रेट असलेली टूथपेस्ट.

5) हिरड्यांतून रक्त येणाऱ्या तोंडाचा प्रकार - दात घासताना किंवा संध्याकाळी जेवताना हिरड्यांमधून अनेकदा रक्तस्राव होतो.

समस्या - प्लाक आणि कॅल्क्युलसमुळे सूजलेल्या हिरड्या, हिरड्यांच्या संसर्गाची अति प्रगत अवस्था, ‘व्हिटॅमिन-सी’ आणि ‘के’ ची कमतरता आणि रक्तस्राव विकार.

दंत उत्पादने - बेंझिडामाइन असलेले माउथवॉश, स्टॅनस फ्लोराइड असलेले टूथपेस्ट आणि टॅनिक ॲसिड असलेले गम ऍस्ट्रिंजन्ट.

6)प्रोस्थेटिक तोंड - रूट कॅनाल ट्रिटमेंट किंवा इम्प्लांट केल्यानंतर तुमच्या तोंडात ४ पेक्षा जास्त दातांवर कॅप किंवा ब्रिज आहे.

समस्या - तोंडातील सर्व कॅप आणि ब्रिजवर पुन्हा संसर्ग आणि खालच्या हाडांचे नुकसान होऊ शकते.

दंत उत्पादने - प्लाक आणि कॅल्क्युलस निर्मिती नियंत्रित करण्यासाठी नियमित फ्लॉसिंग, इंटरडेंटल ब्रश, झिंक सल्फेट असलेली टूथपेस्ट.

दंत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी हे सक्रिय घटक आणि ते तुमच्या दात, हिरड्या आणि इतर ऊतींवर कसे कार्य करतात हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बरोबर उत्पादने वापरून दंत आरोग्याची नियमीत काळजी आणि निरोगी हास्याचे रक्षण करा!

(लेखिका डेंटलदोस्त ॲपच्या संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com