Colon Cancer Causes : आतड्यांच्या कॅन्सरचा सर्वात जास्त धोका तरुण पिढीला; जाणून घ्या लक्षणे... | Early Symptoms And Causes Of Colorectal (Colon) Cancer in young adults | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Colon Cancer Causes

Colon Cancer Causes : आतड्यांच्या कॅन्सरचा सर्वात जास्त धोका तरुण पिढीला; जाणून घ्या लक्षणे...

Colon Cancer Causes : कॅन्सर काही नवीन नाही, पण यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हळूहळू वाढता आहेत. सध्या जगभरात कॅन्सरची प्रकरणे वेगाने पसरत आहेत.

आता यामध्ये कोलन कॅन्सरचेही नाव आले आहे. कोलन कॅन्सर, ज्याला कोलोरेक्टल (कोलन) कॅन्सर असेही म्हणतात, हा खरं तर मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे जो कोलन म्हणजेच मोठ्या आतड्यात होतो.

हे आतडे पचन आणि पाणी शोषण्यात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कोलन कॅन्सरची नेमकी कारणे अद्याप कळू शकलेली नसली तरी तरुणाई त्याला बळी पडत आहे, ही चिंतेची बाब ठरु शकते.

कोलन कॅन्सरची कारणे

कोलन कर्करोगाची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक मानली जातात. याशिवाय झपाट्याने वाढणारा लठ्ठपणा, मांसाचे जास्त सेवन, धूम्रपान आणि मद्यपानाचे जास्त परिणाम, साखरेचे जास्त सेवन आणि शौचाच्या बदलत्या सवयींमुळेही कोलन कॅन्सरचे प्रमाण वाढू शकते.

या कारणांमुळे गुदाशयाच्या आतील भागातील निरोगी पेशी बदलू लागतात आणि नियंत्रणाबाहेर जातात, या बदलामुळे मोठ्या आतड्यात एक ट्यूमर तयार होतो ज्याला कोलन कॅन्सर म्हणतात.

कोलन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

कोलन कॅन्सरचा प्राथमिक अवस्थेत शोध लागल्यास ९० टक्के रुग्णांचे प्राण वाचू शकतात, पण कोलन कॅन्सरच्या लक्षणांबाबत जागरुकता नसणे हे या मृत्यूचे कारण ठरु शकते. म्हणूनच त्याची सुरुवातीची लक्षणे माहित असणे आवश्यक आहे.

1. पोटात वारंवार दुखणे:

जर तुम्हाला तुमच्या पोटात वारंवार दुखत असेल किंवा तुम्हाला पोटात कळ येत असेल तर त्याची तपासणी करुन घ्यावी.

2. वजन:

आजार किंवा औषधामुळे वजन अचानक कमी होऊ लागते किंवा अनेकदा कळतही नाही पण वजन कमी होते किंवा वाढते दोघेही शरीरसाठी घातक आहे

3. पोट साफ न होणे:

कधीकधी पुन्हा पुन्हा शौचास लागते तर कधी कधी अचानक बद्धकोष्ठता जाणवते, या समस्या बाकीही कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिसून येतात.

4. प्रायव्हेट पार्ट दुखणे:

शुला गेले असता अचानक त्या जागी दुखणे ही देखील एक गंभीर समस्या आहे. महिलांना तर याचा त्रास होत असेल तर त्याची बाकीही कारणं असू शकतात अशात आधी जाऊन तपासणी करावी.

5. मल मूत्राचा रंग बदलणे:

मल मूत्राद्वारे अचानक रक्तस्त्राव होणे हे देखील एक लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष करु नका शिवाय त्याचा रंग बदलत असेल तर तेही एक भयावह लक्षण आहे.

6. थकवा आणि अस्वस्थ वाटते:

थोडेसे काम केले, पायऱ्या चढल्या, फिरलात तरीही लगेच थकवा जाणवतो जरा गुदमरायला होते असे होत असेल तर हे चांगलं नाही, या साठी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.