एकच प्याला शरीरावर घाला!

आरोग्यावर मद्याचे फार गंभीर परिणाम
Alchohol
AlchoholSakal

मद्याचे शरीरावर होणारे परिणाम आता सर्वज्ञात आहेत. परंतु चांगली झोप यावी म्हणून काही लोक एक दोन पेग घेऊनच मग झोपी जातात. त्यांना मद्य पिऊन झोपायची सवय लागते. कारण मद्य प्यायल्याने त्यांना लवकर झोप लागते, असा त्यांचा अनुभव असतो. तरी मद्य पिऊन झोपणार्‍या लोकांच्या झोपण्याच्या प्रक्रियेवर आणि एकूणच आरोग्यावर मद्याचे फार गंभीर परिणाम होत असतो. मद्य प्राशन करण्याने पटकन झोप लागते आणि ती फार घातक असते. सामान्यतः नैसर्गिकरित्या झोपणार्‍या व्यक्तीच्या आठ तासाच्या झोपेमध्ये दोन-तीन अवस्था असतात आणि त्या क्रमाक्रमानेच प्राप्त होऊन झोप पूर्ण होत असते.

समज आणि गैरसमज

  • दारू प्यायल्याबरोबर गाढ झोप लागते.

  • नंतरचे काही तास तो बेहोशीत असतो. पण ती झोप नसते.

  • शरीराच्या स्नायूंना हलकेपणा येतो.

  • घशातले स्नायू हलके झाल्याने असा माणूस जास्त घोरतो.

  • ती खर्‍या अर्थाने झोप नसते तर बेहोशी आणि जागणे या मधली एक अवस्था असते.

  • शांत झोप लागते हा लोकांचा गैरसमज आहे.

झोपण्यापूर्वी घेतल्यास...

  • मद्य प्राशन करून झोपणार्‍यांची मज्जासंस्था उलट जास्त सक्रीय होते.

  • हृदयाच्या स्पंदनांचा वेग वाढतो. यामुळे रक्तदाब वाढतो.

  • अशा अवस्थेत झोपणार्यावर एक प्रकारचा तणाव राहतो.

  • त्याच तणावात त्याचा पूर्ण दिनक्रम पार पडतो.

मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी अयोग्य

  • झोपताना घेतलेले मद्य मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करते.

  • मूत्रपिंडासाठी आवश्यक व्हॅसोप्रेसिन हार्मोनची निर्मिती मद्याने बंद होते.

  • शरीरातील पाणी ओढून घेऊन त्याचे शुध्दीकरणाची प्रक्रिया या हार्मोनमुळे संतुलीत राहते.

  • दारूमुळे ही प्रक्र्रिया असंतुलीत होते आणि लघवीवर परिणाम होतो.

  • दारू पिऊन झोपणारा सकाळी बराच थकलेला दिसतो.

  • शरीरातील पाण्याचा समतोल बिघडल्यामुळे डीहायड्रेशन होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com