
Pregnancy Health Care : तिसरा महिना संपताच ही लस घ्यायला विसरु नका, गर्भाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक
Pregnancy Health Care : गर्भवती महिलेला अगदी सुरुवाती दिवसांपासून बाळाच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. तसेच 9 महिन्यांत तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींसह आवश्यक लसीकरणाकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. काही लसी या वेळेत दिल्यास बाळाच्या सुरक्षेचा धोका टळतो.
टिटॅनसच्या इंफेक्शनपासून बाळाचा बचाव करण्यासाठी त्याला टिटॅनसची लस दिली जाते. ज्यामुळे आईसह बाळाचीही सुरक्षा जपली जाते. टिटॅनसचा आजार भयंकर आहे. तेव्हा यापासून बचाव करण्याचा एकमेव उपाय म्हणजे व्हॅक्सिन घेणे.
प्रेग्नेंसीदरम्यान दोन प्रकारच्या लसी गर्भवती महिलेसाठी आवश्यक असतत. त्या म्हणजे टीटी आणि टीडी. या दोन्ही लसी 1960 च्या दशकापासून महिलांना दिल्या जातात. ही लस गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला इंफेक्शनपासून सुरक्षा प्रदान करते.

Pregnancy Health Care Tips
टिटॅनस लस
टिटॅनस किंवा टीटी म्हणजे डिप्थीरिया टॉक्झॉइडची लस असते. बाळाच्या सुरक्षेसाठी ही अत्यावश्यक लस आहे.
ही लस कधी दिली जाते?
महिलांच्या गर्भावस्थेतील १३ व्या आठवड्यात आणि ३९ व्या आठवड्यात ही लस दिली जाते.तर पहिल्या लसीकरणाच्या ४ आठवड्यांनंतर याचा दुसरा डोज दिला जातो. या दोन्ही लसी बाळांना जवळपास ८० टक्के सुरक्षा देते.
टिटॅनसचा धोका
टीटॅनसची लस प्रत्येक प्रेग्नेंसीवेळी महत्वाची आहे. टिटॅनस हा एक घातक आजार आहे. अनेकदा या समस्येमुळे बाळास श्वास घेणे कठीण होते. आणि अशातच बाळाच्या मृत्युचा धोका वाढतो.
म्हणूनच टिटॅनसची लस महत्वाची असते. बाळाची काळजी घेणाऱ्या लोकांनीसुद्धा ही लस घ्यावी. जेणेकरुन बाळ संपूर्ण सुरक्षित राहील.