

Health care
Sakal
बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती व्यस्त झाला आहे. तो आरोग्याबाबत जागरूक नसल्यामुळे विविध आजारांनी ग्रासतोय. आजार हाताबाहेर गेल्यावर व्यक्ती रुग्णालयाकडे धाव घेते. यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याबाबत जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दर तीन महिन्यांनी किंवा वर्षातून दोनदातरी डॉक्टरांना दाखवून तपासण्या करून घ्याव्यात आणि भविष्यात होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव करावा, असा आरोग्यमंत्र गणपती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिल गवळी यांनी दिला.