
Health Care : तापात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, बॉडी टेंपरेचर कमी होण्याऐवजी आणखी वाढेल
Health Care : हवामानातील बदलामुळे सर्दी, ताप ही समस्या हल्ली सामान्य झालीय. हवामानात बदल होताच घरोघरी एकदा तरी तापाचा रूग्ण तुम्हाला आढळून येईल. मात्र तापात काय खावे काय खाऊ नये याबाबत अनेक लोकांना माहिती नसते. तापामुळे तोंडाची चव कडवट वाटते. म्हणून काहीतरी चविष्ट खाण्याची इच्छा अनेकांना होते. मात्र तापात चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने तुमचे बॉडी टेंपरेचर आणखी वाढू शकते. अशा वेळी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सविस्तर जाणून घ्या.
रेड वाइन
ताप असताना वाइन पिण्याची सवय असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. वाइनमधे असलेले घटक तापाच्या स्थिती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

चॉकलेट
तापात तोंडाची चव गेल्याने अनेक लोक चॉकलेट खातात, परंतु तापामध्ये चॉकलेट खाणे हानिकारक ठरू शकते कारण चॉकलेटमध्ये पॉयजनस अमाईन असते जे हिस्टामाइनचे विघटन कमी करते.
प्रोसेस्ड मीट
जर तुम्हाला ताप असेल तर प्रोसेस्ड मीट खाऊ नका कारण या प्रकारच्या मांसामध्ये हिस्टामाइनचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या यकृतावर आणि चयापचयावर हल्ला करते.
खरबूज
जरी उन्हाळ्यात खरबूज खाणे आरोग्यासाठी आणि खूप फायदेशीर मानले जाते, परंतु तापाच्या वेळी ते टाळावे कारण यामुळे ताप आणि कॉलरा वाढण्याची शक्यता वाढते. (Health)

कॉफी किंवा चहा
ताप असताना चहा, कॉफी किंवा अल्कोहोल यांसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये, कारण ते पचायला वेळ लागतो आणि त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. अशा स्थितीत तापामध्ये या गोष्टींचे सेवन टाळावे, तसेच गोड पदार्थ कमी खावेत.