Health: आरोग्याचा खजिना नारळ! पण जरा जपून खा, नाहीतर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coconut Advantages & Disadvantages

Health: आरोग्याचा खजिना नारळ! पण जरा जपून खा, नाहीतर..

Coconut Advantages & Disadvantages: नारळ शरीरासाठी अतिउत्तम मानले जाते. नारळाचं पाणी,दूध, मलाई आणि नारळाचं तेल देखील आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. सोबतच जेवणाची चव अधिक रूचकर करण्यास आणि त्वचेसाठी व केसांसाठीही नारळाचा उपयोग होतो. बहुतेक लोकांना फक्त नारळाचे फायदेच माहिती आहेत. मात्र नारळाचे तोटेही माहिती असणं तेवढंच महत्वाचं ठरतं.

न्युट्रिशनिस्ट जेस हिलार्ड म्हणतात, नारळ आहारात घेण्याचे अनेक उपाय आहेत. आज आपण नारळाच्या फायद्यांसह त्याचे होणारे नुकसानही जाणून घेणार आहोत.

नारळ खाताना कोणती काळजी घ्यावी

नारळ हे सुपरहायड्रेटिंग असतं. नारळामध्ये असणारे इलेक्ट्रोलाईट्स शरीरपेशींच्या फ्ल्युड पातळीमध्ये वाढ करते. (कॅल्शिअम, सोडियम, मॅग्नेशिअम, मिनरल्स) आपलं शरीर जेव्हा हायड्रेटेड असतं तेव्हा आपली स्किनही चांगली दिसते. तसेच आपल्या शरीराचं तापमानही संतुलित राहातं.

नारळाचे फायदे

नारळाचा उपयोग फक्त स्वयंपाकघरातच नाही तर शरीर, केस आणि त्वचेसाठीही केला जातो. नारळामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. तसेच हे सर्वात उत्तम मॉश्चरायझर आहे. यातून मिळणारे अँटिऑक्सिडंट वाढत्या वयातही तुम्हाला तरूण ठेवण्यास मदत करते.

हेही वाचा: Coconut : नारळाच्या करवंटीला का आले सोन्याचे दिवस ?

नारळ आहारात योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यदायी असतं. नारळात काही प्रमाणात भाज्या आणि पोषक तत्व असतात. तसेच विटॅमिन बी आणि काही मिनरल्सही असतात. हा मँगनिजचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे हड्ड्या मजबूत होतात. यात सेलेनियम, आयरन आणि कॉपरसारखे मायक्रोन्यूट्रियंट आणि अँटिऑक्सिडंटही असतात.

हेही वाचा: Health: महत्वपूर्ण! पाठीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, असू शकतात कँसरचे लक्षणं

नारळ आहारात घेण्याचे काही तोटे

न्यूट्रिशनिस्टच्या मते, नारळ तेल हे फार कमी नारळाच्या फार कमी झाडांमधून मिळतं. तसेच यात सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. नारळाच्या तेलात त्याच्या फ्लेक्सच्या तुलनेत झिरो फायबर असतं. त्यामुळे आठवड्यातून तिनपेक्षा जास्त वेळा आहारात घेतल्यास हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे नारळ तेलाचा वापर कमीत कमी करावा आणि याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.