esakal | सॅनिटायझरचा वापर करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

बोलून बातमी शोधा

sanitizer
सॅनिटायझरचा वापर करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: मागील एका वर्षापासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक असून सध्याचा मृत्यूदरही जास्त आहे. आजच्या घडीला देशात प्रतिदिन ३ लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून सध्या सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोरोनाचे सर्व नियम पाळून सॅनिटायझरचा उपयोग केला पाहिजे. पण सध्या सॅनिटायझरचा योग्य वापर केला पाहिजे. सॅनिटायझरचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

१. ६० टक्के अल्कोहल असणारे सॅनिटायझरचा उपयोग करावा-

वाढत्या कोरोना प्रसारावर सॅनिटायझरचा परिणामकारक उपयोग केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. आपण जो सॅनिटायझर वापरतो त्यात ६० टक्के अल्कोहल असले पाहिजे. अशा सॅनिटायझरचा मोठा फायदा होतो.

२. हात कोरडे झाले पाहिजेत-

काही लोक त्यांच्या हातावर सॅनिटायझर लावतात आणि हलके घासतात. सॅनिटायझर वापरण्याचा हा योग्य मार्ग नाही. सॅनिटायझर पूर्णपणे कोरडे होईपर्यंत घासून घ्या. असा वापर केल्यास सॅनिटायझर धोकादायक जीवाणू नष्ट करण्याचे काम करते.

३. सॅनिटायझेशननंतर हातांनी लगेच जेऊ नये-

हातांना सॅनिटायझ लावल्यानंतर ३० सेकंदानंतर त्या हातांनी जेवन करावे किंवा त्याचा वापर करावा. जर तसेच जेवले तर आतड्यांवर आणि लिवरवर वाईट परिणाम होतो. त्यामूळे काही वेळ गेल्यानंतर हात कोरडे झाल्यानंतर हातांचा उपयोग खाण्यासाठी करावा.

४. सॅनिटायझर डोळ्यांपासून दूर ठेवावे. त्याचा डोळ्यांशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट येऊ नये यावर लक्ष दिले पाहिजे.

५. तसेच सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असल्याने ते आगीपासूनही दूर ठेवले पाहिजे.

६. सॅनिटायझर तोंडात जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे